एक वसलेवार म्हणून तुमची सोशल मीडियावर प्रखर उपस्थिती आहे का? सोशल मीडिया रिअल इस्टेट क्षेत्रात महत्वाची भुमिका साकारते. यामुळे मोठया प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोचण्यास मदत होते. आणि तुमच्या विद्यमान ग्राहकांशी मजबूत नातं बनवून ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मार्केटिंग मधील प्रयत्नांना गती देऊ शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या रिअल इस्टेट सेवांना विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन,ट्विटर, ही माध्यमे खरेदीदारांशी आणि विक्रेत्यांशी जुळण्यास तुम्हाला मदत करतात. सोशल मीडिया मार्केटिंग ट्रेंड्स बद्दल तुम्ही जागरूक आहात का? काही सूचना ज्या तुम्हाला सोशल मीडियावर मार्केटिंग करताना पाळाव्या लागतील त्या खालील प्रमाणे दिल्या आहेत.
१. तुमच्या श्रोत्यांना सुशिक्षित करा.
तुमची विश्वास पात्रता वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या श्रोत्यांना सोशल मीडियाबावर सुशिक्षित करायला हवे. त्याचबरोबर फक्त प्रॉपर्टी लिस्टिंगवर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला सर्वसामान्य प्रश्न जे घर खरेदीदार आणि विक्रेत्यांनी विचारले आहेत त्यावरही ध्यान द्या. त्यांना काय हवंय याचा शोध घ्या. आणि त्यानंतर त्यावर ब्लॉग पोस्ट करा. जसंकी तुम्ही रियाल इस्टेट मध्ये होणाऱ्या नुकसानाबद्दल बोलू शकता. किंवा घर खरेदीच्या सूचना यावर ब्लॉग तयार करू शकता. अश्या प्रकारच्या ब्लॉग्सचा विविध सोशल मीडियाच्या माध्यमांवर शेअर होण्याकडे कल असतो. याव्यतिरिक्त लोकांना व्हिजुअल कंटेन्ट आवडतो. विडीयो मुळे तुमच्या श्रोत्यांसोबत भावनिक नातं तयार करण्यास मदत होते. खरंतर युट्युब वरील विडिओमुळे तुमच्या वेबसाईटची रँकिंग वाढते. जेव्हा तुम्ही सोशल मीडियासाठी मौल्यवान कंटेन्ट तयार करता तेव्हा लोक तुमच्याकडे परत यायला लागतात.
२. तुमच्या फॉलोवर्स सोबत जोडलेले राहा.
अनेक घर खरेदीदार त्यांच्या प्रश्नांसाठी तातडीने उत्तर मिळावं अशी अपेक्षा करतात. आणि त्यातल्या अनेक लोकांनी रिअल इस्टेट एजेंट्सना संपर्क साधायचं बंद केलं आहे. अनेक घर खरेदीदार फेसबुकने सल्ला दिलेल्या वैशिष्ठ्यांचा वापर करत आहेत. किंवा रिअल इस्टेट कार्यालयांना ट्विट करण्यासाठी ट्विटरचा वापर केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुमचा सक्रिय सहभाग असायला हवा. तुमच्या फॉलोवर्स सोबत संभाषण करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जे लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत ते कदाचित घारेदीच्या पहिल्या पायरीवर असतील.म्हणून तुम्ही त्यांच्या प्रश्नांना सगळ्यात पहिल्या उत्तर द्याल याची खात्री घ्या. यातून कदाचित काहीतरी चांगलं होईल आणि तुम्ही भाग्यवान ठराल.
३. सगळ्या कॅमेंट्सना प्रतिसाद द्या.
जेव्हा तुम्ही कोणत्याही कंमेंटला प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही तत्पर आणि सभ्य असायला हवे.तसेच तुम्ही नकारात्मक कॉमेंट्सना दुर्लक्ष्य करायला हवे. जे लोक तुम्ही उपलब्ध केलेल्या सेवांचे कौतुक करतात त्यांना प्रतिसाद द्या. अनेक लोक विशिष्ठ लिस्टिंग बद्दल माहिती मिळवण्यासाठी कंमेंट करतात. जेव्हा तुम्ही त्यांना त्वरित प्रतिसाद देता तेव्हा कदाचित तुम्हाला अजून एक ग्राहक मिळेल.
"व्यावसायिक लेखक हा एक हौशी व्यक्ती आहे जो कधीच आपले लिखाण सोडत नाही. -रिचर्ड बॅक”
४. तुमच्या प्राप्त ग्राहकांना कधीही दुर्लक्ष करू नका.
जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तींशी जुळता जेव्हा तुमच्या प्राप्त ग्राहकांना विसरू नका. तुम्ही पूर्वीच्या खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना तुमच्या सोशल मीडियावरील गटांवर सामील होण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. किंवा तुमच्या फेसबुकवरील रिअल इस्टेट व्यवसायाच्या पेजला लाईक करण्यासाठी आमंत्रित करू शकता. ज्या ग्राहकांनी आधी तुमच्यासोबत व्यवहार केला आहे त्यांना त्यांचा सकारात्मक अनुभव शेअर करण्याची ताकत आहे.आणि कदाचित ते त्यांच्या मित्रांना तुमची शिफारस करतील. तुमच्या ग्राहकांचे तुमच्या ब्रँड बद्दल काय मत आहे यावर तुम्ही लक्ष द्यायला हवे. उदाहरणार्थ तुम्ही जर सर्वेक्षण केलंत आणि जर तुम्हाला गुगल फॉर्ममधूल मौल्यवान अभिप्राय मिळेल. या नीती मुळे तुम्हाला मनोरंजक रिअल इस्टेट कंटेन्ट सोशल मीडियावर पोस्ट करायला मदत होते.
५. घराची जाहिरात करण्यापेक्षा शहराची जाहिरात करा.
घर खरेदी करणाऱ्यांना सहसा पूर्ण शहराबद्दल तपशीलवार माहिती हवी असते. जसंकी एका विशिष्ट ठिकाणी राहण्याचे फायदे. किंवा एका ठिकाणापासून कोण कोणत्या गोष्टी जवळ आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रदेशाबद्दल वर्णन करत असता तेव्हा जास्त अलंकारिक शब्दांचा वापर करू नका. तुम्हाला त्या प्रदेशाच्या शेजारच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा समावेश करायला हवा.तुमचे सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी इंस्टाग्रामचे व्यावसायिक अकाऊंट योग्य आहे. तुमच्या शहरात जिथे मालमत्ता आहे तेथील फोटो पोस्ट करा. तुम्ही तुमच्या ट्विट मधील ट्विट हॅन्डल मध्ये “@CityOf...” नमूद सुद्धा करू शकता. तुमच्या शहरात जिथे मालमत्ता आहे त्याची जाहिरात करण्यास मदत होते.
सारांश.
तुम्हाला रिअल इस्टेट एजेंसीला पुढच्या पातळीवर घेऊन जायचे आहे का? तर मग तुम्हाला रिअल इस्टेट मार्केटिंगच्या रणनीतींची श्रेणी वाढवायला हवी. म्हणजेच ज्याप्रकारे तुम्ही ऑफलाईन सामाजिकरण करता त्याचप्रमाणे तुम्हाला रिअल इस्टेट सोशल मीडिया मार्केटिंग रणनीतींमध्ये गुंतवणूक करावी लागेल. यामुळे तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही तीक्ष्ण होण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचवेळी तुम्ही जे काही कार्य करताय त्या कार्याला अस्सल आणि लक्षवेधी बनवण्यास विसरू नका .
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon