आम्हाला सगळ्यांना आपल्या वेबसाईटला सर्च इंजिन मध्ये उच्च गणतीत बघायचे आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या वेबसाईटवर नवीन ट्रॅफिक खेचून आणायचे असेल. त्यासोबत तुमच्या विद्यमान ग्राहकांना सुद्धा तुम्ही टिकवून ठेवायला हवं. त्यासाठी श्रोत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी चर्चेत असणाऱ्या विषयांवर लिहिणे खुप महत्वाचे आहे. यामुळे लोक तुमचा मनोरंजक कंटेन्ट सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर शेअर करतात. तुमच्या वेबसाईटसाठी कंटेन्ट तयार करताना कोणते विषय चर्चेत आहेत याचा तुम्ही विचार करायला हवा. तुमचा कंटेन्ट लोकांना कृती करण्यासाठी प्रेरणा देणारा असावा.
काही ब्लॉग बद्दल अद्वितीय कल्पना तुम्हाला उत्स्फूर्तपणे उमगत असतील. सध्या चर्चेत असणाऱ्या अनेक आर्टिकलच्या विषयांची यादी आहे ज्यावर तुम्ही लिहू शकता. पण जर तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि जर त्यासाठी आडमार्ग असेल तर मग काय? तुमच्या वेबसाईटचे मूल्य अधिक प्रमाणात वाढवतील अश्या काही लोकप्रिय ब्लॉगच्या विषयांसाठी कल्पना खालील प्रमाणे दिलेल्या आहेत
* व्यवसायाचे धडे.
* "कसे करावे" (“How-to”) ट्युटोरिअल्स.
* वर्षभरात होणाऱ्या कार्याच्या सारांशाचा अंदाज.
*जाहिरात करणारा कंटेन्ट.
* औध्योगिक कार्यक्रम.
* औध्योगिक संशोधन.
*उपयुक्त साधने.
* साहचर्याचे मूल्य आणि संस्कार.
लिहिण्यासाठी कोणते मनोरंजक विषय आहेत ज्या बद्दल लिहु शकतो.
हाऊ-टू"(“how-to”) गाईड्स
तुम्ही असंख्य चांगल्या विषयांसोबत पुढे येऊ शकता. अनेक लोकांना हाऊ-टू"(“how-to”)कंटेन्ट आवडतो. यामुळे मोठया प्रमाणात लोक आपल्याकडे खेचले जातात. इतर लोक जे करत आहेत त्यापेक्षा तुम्हाला थोडं काही वेगळं करायचं आहे का? तर तुम्ही त्याबद्दल चांगल्या स्वरूपात लिहू शकता. तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात याचा विचार करा. एकदा तुम्ही विषय शोधून काढलांत तर मग तुम्ही टप्याटप्याने त्या विषयाचे स्पष्टीकरण करू शकता. जर प्रभाव टाकायचा असेल तर प्रत्येक पायरीचे उदाहरण आणि तथ्यासोबत स्पष्टीकरण द्या.
अनुभवावर अध्ययन आधारित असते.
अध्ययन हा आर्टिकल तयार करण्याचे अजून एक चांगले स्वरूप आहे. तुम्ही स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवावर आधारित आर्टिकल अध्ययन करून लिहू शकता. जर समजा एखाद्या क्षेत्रात तुम्ही उत्कृष्ठ असाल जिथे इतर लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि ते त्या समस्यांवर तोडगा शोधत आहेत. इतरांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित करेल अशी तुमच्या यशाची कथा तुम्ही लिहून सादर करू शकता. त्यासोबत तुमच्या अनुभवातून घेतलेल्या धड्यांचे वर्णन करून तुम्ही शेअर करू शकता.
काल्पनिक संभाषण
तुम्ही जोखीम घेऊन काल्पनिक संभाषण लिहू शकता. सगळ्यात पहिला तुम्हाला ज्या विषयात रस आहे तो विषय निवडा. त्यानंतर तुम्ही तुमचे आणि काल्पनिक व्यक्तीचे संवाद ब्लॉगच्या स्वरूपात लिहू शकता. संवाद लिहिणे सोपे नाही आहे. पण ते अस्सल वाटतं. त्यासोबत तुम्ही काल्पनिक ईमेलचा प्रयोग पण प्रयत्य करून बघू शकता.
" जे कष्ट न घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन"
औध्योगिक वार्ता, कार्यक्रम आणि संशोधन
एखाद्या उध्योगात नवीन संशोधन सुरु आहे का ? त्याबद्दल तुमच्या पुढील ब्लॉगमध्ये माहिती द्या. त्यासोबत नवीन तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा तुम्ही भाकीत करू शकता. आणि त्याचा भविष्यातील पिढीवर कसा प्रभाव पडेल हे सुद्धा सांगू शकता. त्यासोबत तुम्ही पूर्वीच्या ट्रेंड्स बद्दल मत मांडू शकता. त्यासोबत तुमच्या अंदाजांना सिद्ध करण्यासाठी काही तथ्यांचा समावेश करायला हवा. नुकत्याच झालेल्या औध्योगिक कार्यक्रमाबद्दल तुमचा अनुभव लिहु शकता.
सध्या चर्चेत असणाऱ्या विषयांवर तुमचा दृष्टिकोन काय आहे ते समाविष्ट करा.
सध्या चर्चेत असणाऱ्या विषयांवर लोकांना वाचयला आणि शेअर करायला आवडते. एखाद्या विषयावर किंवा बातमीवर तुमचे काय मत आहॆ ते तुम्ही लिहू शकता. असा विषय निवडण्याचा प्रयत्न करा जो लोकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकेल. त्याचबरोबर याआधी प्रसारीत झालेल्या कंटेन्ट मधून सुद्धा तुम्ही काही कल्पना घेऊ शकता. आणि त्यानंतर तुमच्या विचारांचा समावेश करा. ब्लॉगसाठी ही अजून एक अद्वितीय कल्पना आहे.
महत्वाच्या सूचना आणि व्यावसायिक साधने
तुम्ही महत्वाच्या साधनांबद्दल लिहू शकता जे व्यवसायाला उपयोगी पडु शकतात. तपशीलवार ब्लॉग पोस्ट तयार करा आणि त्या साधनांचा कसा वापर करायचा या बद्दल विस्तारीत माहिती द्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची जाहिरात करणारा आकर्षक विडिओ तयार करा. उपयोगी यादी (“Useful list”) हा ब्लॉगचा एक सगळ्यात लोकप्रिय विषय आहे. तुम्ही एखाद्या विषयात चांगले आहात आणि त्याबद्दल तुम्ही अजून काहीही शेअर नाही केलंत ? तर तुम्ही उत्तम उपयोगी सूचनांची यादी तयार करू शकता. यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. जसंकी, " १० महत्वाची कारणे".
शेवटचे विचार
आर्टिकल लिहिण्यासाठी चर्चेत असणारा विषय निवडून तुम्ही नक्कीच तुमच्या वेबसाईटचे रँकिंग सुधारू शकता. तुमच्या कंटेन्ट राईटींगचे कौशल्य सुधारण्यासाठी तुमचा वेळ आणि कष्ट गुंतवा. याचे फळ तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल. जरी यादी मोठी असेल तरीही तुमच्या निशान्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतील अश्या प्रकारचे ब्लॉगसाठी नाविन्यपूर्ण विषय घेऊन तुम्हाला समोर यावे लागेल. तुम्हाला ब्रॅंडिंग करण्यासाठी वेबसाईट कंटेन्ट रेटिंग सेवांची नेमणूक करण्याची गरज का आहे याची ५ महत्वाची कारणे खालील प्रमाणे दिलेली आहेत.
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon