Wednesday, April 8, 2020

जागतिक पातळीवर थैमान घालणारा एक संसर्गजन्य रोग- कोरोना वायरस

अनेक सूक्ष्म विषाणू एकत्रित येऊन तयार झालेल्या एका विषाणूंच्या गटाला कोरोना वायरस असे नाव देण्यात आले आहे, ज्याला कोवीड-19 या नावाने सुद्धा संबोधले जाते. हजारोंच्या संख्येने लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कोरोना वायरसचा जन्म चीन देशातील वुहान या शहरात झाला. या रोगाने अनेक लोकांना आपल्या जाळ्यात खेचले आहे. असंख्य लोक मृत्युमुखी पावले आहेत तर कितीतरी लोक या रोगाशी झुंज देत आहेत. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी काही लोक सुदैवाने बरे सुद्धा झाले आहेत. या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने सातीचा रोग असे घोषित केले आहे. हा रोग प्राण्यांना, पक्षांना तसेच मानवांना होतो. मानवांच्या शरीरात  हा विषाणू श्वसनाचे इंद्रिय नाक, हात आणि डोळे यांच्या मार्फत प्रवेश करतो. या रोगावर इलाज करण्यासाठी अजूनही कोणत्याही रामबाण उपायाचा शोध लागलेला नाही. तरीही देशातील तज्ञ डॉक्टर विविध पद्धतीने या रोगाचे अतिक्रमण थांबविण्यासाठी विविध उपाय सुचवत आहेत तसेच कोरोना बाधित अनेक लोकांवर ईलाज करून त्यांना बरे करण्याच्या सेवेत अनेक डॉक्टर तत्पर आहेत. 

कोरोनाचे वायरस हे कंद आकाराच्या पृष्ठभागाच्या अंदाजानुसार प्लीओफॉर्मिक गोलाकार कणासारखे आहेत. या व्हायरसच्या कणांचा व्यास सुमारे १२व नॅनो मीटर इतका असतो. हा रोग मानव तसेच प्राणी आणि पक्ष्यांनाही होतो. हा रोग झाला की गायी आणि डुकरांना अतिसार होऊ लागतो. पक्ष्यांना आणि कोंबड्यांना श्वसनाचे त्रास होतात आणि मानवाला सर्दी, खोकला आणि ताप यासारखे आजार होऊ लागतात. हा रोग प्राणी आणि पक्ष्यांनाही होतो आणि त्यांचे सेवन केल्यास मनुष्यालाही हा रोग होण्याची संभावना असते म्हणून या कोरोना व्हायरसच्या काळात अंडी, मांस आणि इतर मासांहारी पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. 

कोरोना वायरस हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एकमेकांच्या संपर्कात आल्याने किंवा कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. हा आजार खासकरून ६० वर्षाच्या आसपास आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लवकर होण्याची शक्यता जास्त असते. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना हा रोग पटकन होऊ शकतो. तसेच ज्यांना काही वैद्यकीय समस्या जसे की हृदय व रक्तवाहिन्या संबंधित आजार किंवा मधुमेह, श्वसनरोग, कर्करोग आणि इतर विविध रोग त्यांना लवकर होण्याची शक्यता असते. 

कोरोना वायरस कश्याप्रकारे पसरतो?

या रोगाचे प्रमाण अधिक वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे हा रोग एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. जर या रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे होय. काही काळासाठी देशातील नागरिकांनी ठराविक सामाजिक अंतर राखून ठेवले तर या रोगाचे प्रमाण हळूहळू नक्कीच कमी होईल. 

कोरोना वायरसची मूलभूत लक्षणे

जागतिक आरोग्य संघटना असे म्हणते की सहा लोकांमधील एक व्यक्ती ही मोठ्या प्रमाणात आजारी पडण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार ताप येणे, कोरडा खोकला लागणे, नाक गळणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे म्हणजेच स्वासोच्छवास करताना त्रास होणे, जुलाब आणि इतर शारीरिक वेदना होणे ही कोरोना वायरसची मूलभूत लक्षणे आहेत. या रोगामुळे काही लोकांच्या जिभेची चव घेण्याची क्षमता आणि विविध गंध अनुभवण्याची नाकाची क्षमता कमी झाल्याचे आढळून आले आहे. ज्या लोकांना सौम्य प्रमाणात कोरोना वायरसची लागण झाली आणि जास्त तसेच कमी प्रमाणात ताप आला अश्या लोकांपैकी ८०% लोक कोणत्याही विशिष्ठ प्रकारचा उपचार न घेता डॉक्टरांनी केलेल्या इलाजावरून बरे झाले आहेत. 

युनायटेड किंगडम येथील राष्ट्रीय आरोग्य सेवा यांनी कोरोना वायरसची सुचवलेली दोन महत्वाची लक्षणे खालील प्रमाणात दिलेली आहेत. 

शरीराचे उच्च तापमान-   यामध्ये तुमच्या शरीराचे खासकरून छातीवर आणि पाठीवर स्पर्श केल्यावर अधिक उच्च तापमान जाणवते. 

सतत येणारा खोकला-  तुम्हाला सतत खोकला यायला सुरुवात होते. 

ताप आणि खोकला आला की कोरोना झाला आहे की नाही  हे तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जायचे का?

युनायटेड किंगडम येथील राष्ट्रीय आरोग्य सेवा यांनी सांगितल्या नुसार जर कुणालाही साधारण ताप किंवा खोकला असेल तर घाबरून लगेचच डॉक्टरांकडे जाण्याची काहीही गरज नाही. ज्या व्यक्तीला ताप आणि खोकला व इतर काही आजार असेल तर ती व्यक्ती कमीतकमी ७ दिवस आणि जर ती व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत असेल तर  त्या व्यक्तीने १४ दिवस घरातल्यांशी आणि इतरांशी जास्त संपर्क न साधता स्वतःला त्यांच्यापासून लांब ठेऊन त्यांची आणि स्वतःची काळजी घ्यावी. घरात वावरताना मास्क वापरावा आणि हात स्वच्छ धुवावेत, ज्यामुळे सर्दी आणि खोकला सारखे आजार पसरणार नाहीत आणि सामाजिक अंतर ठेवल्याने ती व्यक्ती लवकर बरी होईल आणि इतरांना सुद्धा हा आजार होणार नाही. जर या काळात आजार बरा झाला नाही किंवा आजाराचे प्रमाण जास्त वाढले आणि इतर कोरोना संबंधित लक्षणे आढळून यायला लागली तर त्या व्यक्तीने डॉक्टरांकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी. 

कोरोना वायरस पासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे?

कोरोना सारख्या अफाट्याने पसरणाऱ्या रोगावर निश्तित असा इलाज नसला तरी काही साधे आणि सरळ उपाय आहेत ज्यांना आपण अमंलात आणून स्वतःचे आणि इतरांचेही कॉरोनसारख्या महाभयंकर रोगापासून संरक्षण करू शकतो. काही  उपायांवर अम्मल बजावणी केल्यास हा रोग होण्याचे टाळते आणि एकमेकांमधून हा रोग पसरण्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते. 
                   

 आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना तसेच इतरांना कोरोना वायरस होऊ नये यासाठी खालील गोष्टी आमलांत आणायला हव्या -

  • सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येकाने घरीच राहावे आणि सामाजिक अंतर निर्माण करावे. 
  • मोठ्या कार्यक्रमांना आणि सामाजिक कार्यक्रमात जाण्याचे टाळले पाहिजेत. 
  • इतरांशी जवळून संपर्क करण्याचे टाळा. खासकरून जी व्यक्ती आजारी आहे तिच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा. 
  • गरज नसल्यास सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळा. जर महत्वाच्या कारणासाठी बाहेर गेलात तर मास्क घालून जायला हवे. एकमेकांमध्ये  २ मीटर किंवा ६ फुटाचे अंतर ठेवा. 
  • बाहेरून आल्यावर विनाकारण डोळ्यांना, चेहऱ्याला आणि तोंडाला हात लावू नका. स्वच्छ हात पाय धुतल्यानानंतर घरात वावरा. 
  • नियमितपणे स्वतःचे हात साबणाने किंवा हॅन्ड वॉशने स्वच्छ धुतले पाहिजेत. 
  • शिंकताना किंवा खोकताना तुमचे नाक आणि तोंड रुमाल, टिशू पेपर किंवा हाताने झाकायला हवे.
  • वापरलेला टिशू पेपर कचऱ्याच्या पेटीमध्ये टाका, रुमाल रोज स्वच्छ धुवून वापरा आणि शिंकल्यानंतर हात स्वतःच धुवा.
  • दररोज वापरणाऱ्या वस्तू स्वच्छ धुवा आणि त्यांचे निर्जंतुकिकरण करा त्यामुळे घटक विषाणूंचे संक्रमण टाळले जाते. 
  • लांबचा प्रवास, मित्र मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी भेट होईल तितकी टाळा. 
  • आंबट चवीचे पदार्थ आणि फळांचे सेवन करा. दररोजच्या आहारात क- जीवनसत्व असणाऱ्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. कारण क- जीवनसत्व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. 

जर आपण सर्वानी सोशल मीडियावरील काही अफवांना घाबरून न जात आणि खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवता सरकारचे नियम, डॉक्टरांनी दिलेली माहिती, आरोग्य संबंधित संघटनांचे सल्ले आणि वरील दिलेली माहिती समजून घेऊन काय करावे आणि काय करू नये हे ध्यानात ठेऊन त्याप्रमाणे वागलो तर आपण नक्कीच कोरोना रोगाच्या वाढणाऱ्या प्रसाराला थांबवू शकतो. वरील सांगितलेल्या गोष्टीचे नियमितपणे पालन केल्यास कोरोना नामक रोगाचा प्रसार हळूहळू थांबवून आपण एक दिवस नक्कीच या रोगावर विजय मिळवून अधिसारखे आयुष्य नक्कीच जगू शकतो. 
Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon