Tuesday, December 3, 2019

बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग का करून घ्यावी ?

दररोजचा कंटेन्ट लिहिणे आणि व्यवसायासाठी कंटेन्ट लिहिणे ह्या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. जर निकाल बघितला
तर बाह्यस्त्रोत्रातून वेब कंटेन्ट  मिळवणे उपयुक्त बनले आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात भर घालायची आहे का?
सगळ्यात पहिला तुम्ही दर  महिना २० पोस्ट्स करायला हवे. व्यवसायातील इतर कामांमुळे दार महिना २० पोस्ट्स
करण्याचे लक्ष्य गाठण्यास कठीण होतं. त्यासाठीच बाह्य स्तोत्रातून  योग्य अशी कंटेन्ट राईटींग एजंसी निवडणे महत्वाचे
आहे. योग्य लोक आणि ग्राहकांसाठी बाह्य स्तोत्र महत्वाचे आहे.
बाह्य स्तोत्र कंटेन्ट रायटिंग का?
 दररोज तुम्ही आकर्षक कंटेन्ट प्रकाशित करायला हवा. त्यामुळे वेबसाईटचे ट्रॅफिक मोठया प्रमाणात नक्कीच वाढेल. लोक तुमच्या कंटेन्ट कडे आकर्षित होणं बंद झालं आहे का? तुमच्या अपुऱ्या गुणवत्तेच्या कंटेन्ट मुळे कदाचित असं झालं असेल. म्हणून ब्लॉग्सचे पोस्टिंगआणि इतर व्यावसायिक कार्याचे व्यवस्थापन  दृढ पणे केले पाहिजे. दररोजच्या कंटेन्ट मार्केटिंग च्या योजनांचे  व्यवस्थापन अवघड वाटत आहे का? त्याऐवजी तुम्ही बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. ज्यावेळी तुम्ही योग्य अश्या कन्टेन्ट राईटींग एजेंसी कडून आपले काम करून घेता त्यावेळी तुमचा व्यवसाय आपोआप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने वाढतो.
 *आकर्षक कंटेन्ट तुमच्या सर्च इंजिनचा दर्जा वाढवतो.
* तुमच्या व्यवसायातील कंटेन्टची घनता वाढवतो.
* वेबसाईटच्या रेटिंग मध्ये वाढ होते.
* आकर्षक ब्लॉग्स पोस्टिंग्स, व्हाईट पेपर्स, -बुक्स आणि केस स्टडीस प्रकाशित करणे सोपे जाते.
* -मेल मार्केटिंग कॅम्पेन चालविणे त्याहूनही  खूप सोपे आहे.
* उत्तम ग्राहक मिळविण्यात मदत होते.
त्यामुळे तुमच्या वेबसाईट कडे  ट्रॅफिक खेचले जाते.
* ह्यामुळे कंटेन्ट मधील प्रमाण  आणि सुसंगत  कायम राहते.
* वरील सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त बाह्य स्तोत्रातून तुमच्या वेबसाईटवर भेट देणाऱ्या लोकांना  अचूक माहिती  पुरविली जाते.
 बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग कशी मिळवावी?
 जर लिहिणे हा तुमचा प्रांत नाही तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्ही बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग घेऊ शकता. या युक्तीने निश्चितपणे तुम्ही तुमच्या व्यापाराची गुणवत्ता वाढवू शकता. जेव्हा तुम्ही बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग मिळवता त्यावेळी कंटेन्टची गुणवत्ता राखून ठेवण्यासाठी काही युक्तीचा वापर करावा लागतो. जर  तुम्हाला अपेक्षित अश्या  गुणवत्तेचा कंटेन्ट मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचे विचार कंटेन्ट राईटींग एजेन्सी सोबत संपर्क साधून सांगायला हवेत.
 * बाह्य स्तोत्रांमधे कंटेन्ट क्रिएशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि विडिओ क्रिएशन या गोष्टी कंटेन्ट राईटींग एजंसी करते.
 * त्याव्यतिरिक्त तुम्हाला आरओआय(ROI )चे मूल्यमापन करावे लागते. हे काम खुप वेळ घेणारे असते. कदाचित तुमचा संघ हे काम करण्यासाठी जास्त वेळ घेत असेल. जसंकी ब्लॉग पोस्ट्स तयार करणे किंवा मार्केटिंग साठी योजना आखणे.अशा कामांमध्ये बाह्य स्त्रोत्रातून घेतलेला कंटेन्ट तुमचा वेळ आणि पैसे वाचविण्यास मदत करतो.
 * तुम्हाला सध्या चालू असणाऱ्या मार्केटिंग ट्रेंड्स बद्दल जागरूक असावे लागते.
* बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट राईटींग घेण्याआधी तुम्हाला  कंपनीची  एक प्रभावी मार्गदर्शक शैली तयार करावी लागते. तुमच्या कंपनीच्या मार्गदर्शकाने तुम्हाला हव्या असणाऱ्या  लिखाणाच्या शैलीला आणि स्वरूपाला अधोरेखित करायला हवे.
 * कंटेन्ट तयार करण्यासाठी तुम्ही विशिष्ट माहिती पुरवायला हवी. कंटेन्ट किती असावा , तुम्हाला वेबसाईट मधील कंटेन्ट साठी  समाविष्ट करायचे असतील असे  आवश्यक सूचक शब्द आणि त्याबरोबर तुमचा प्रोडक्ट किंवा सेवा ग्राहकांना व्यवस्थित समजण्यासाठी छायाचित्रे आणि लिंक्स सुद्धा पुरावाव्या लागतील. या सगळ्या सूचना कंटेन्टची शैली आणि गुणवत्ता राखून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
 * शेवटचं पण महत्वाचं कि जेव्हा आपण बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट घेतो तेव्हा आपण आपल्या संवेदनशील विधानांचे संरक्षण करायला हवे.
बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट घेण्याचे फायदे :-
तुमच्याकडे पुष्कळ असे कंटेन्ट लिखाणाचे काम शिल्लक आहे आणि ते काम तुम्हाला बाह्यस्तोत्रातून करून घ्यायला आवडेल कायबाह्यस्तोत्राच्या मार्गातून कंटेन्ट राईटींग एजन्सीकडून कंटेन्ट लिहून घेण्याचे काही महत्वाचे फायदे खालील प्रमाणे दिले आहेत.
 * यामुळे कंटेन्ट तयार करण्याचे काम अतिशय  वेगाने होते.
 * आर्टिकल्स, ब्लॉग्स पोस्ट करण्यात कमी वेळ जातो आणि त्यामुळे तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.
 * अनेक कामे सोपी होतात.
* इतरांच्या प्रविण्यांचा बाह्य स्तोत्रामुळे आपल्याला  फायदा  होतो. इतरांच्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा योग्य वापर आपण करू शकतो.
 * तुमच्या गुंतवणुकी पेक्षा तुम्हाला जास्त फायदा होतो.
 * यामुळे तुमच्या कन्टेन्ट मार्केटिंग योजनांना सामर्थ्यवान होतात.
 * व्यावसायिक संबंध अमूल्य बनवण्यास मदत होते.
 * विविध प्रकारचे  कंटेन्ट तयार होतात
 * सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची ऊर्जा इतर गोष्टींसाठी वापरू शकता
 " जे कष्ट घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. " - स्याम्यूल जॉन्सन
बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट घेणेग्राहकांची संख्या वाढवण्याचा एक उत्तम मार्ग.
तुम्ही बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट घेण्यास सुरवात केली आहे का? जर नाही केली तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुमची तुमच्या कंटेन्ट मार्केटिंग योजना बदलू शकता. जेव्हा तुम्हाला बाह्य स्तोत्रातून कंटेन्ट घेणे म्हणजे नक्की काय हे समजते तेव्हा कंटेन्ट मार्केटिंग तुमच्यासाठी सोपी होऊन जातेबाह्य स्तोत्रातील  कंटेन्टची गुणवत्ता राखून ठेवली तर बाह्य स्तोत्र हा तुमच्या कंपनी साठी एक मोठा ठेवा होतो. बाह्य स्तोत्राचा उत्तम अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला  कंपनीची  एक प्रभावी  मार्गदर्शक शैली तयार करून द्यावी लागते.  
                                                                                                           Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon