Sunday, November 10, 2019

२०१९ साठी ५ अग्रेसर रिअल इस्टेट मार्केटिंगच्या रणनीती

तुमची स्वतःची रिअल इस्टेट मार्केटिंग कंपनी आहे का? आणि सध्याच्या कंटेन्ट मार्केटिंग ट्रेंडस सोबत जुळण्यासाठी तुम्ही  लढा देण्याचा प्रयत्न करत आहात का? या डिजिटल रिअल इस्टेटच्या जगात स्थिर राहण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन उपस्थिती बनवावी लागेल. जास्तकरून घर खरेदीदार त्यांच्या स्वप्नातले घर ऑनलाईन शोधतात. तुमच्या संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही  ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग रणनीतींचे अनुसरण करावे लागेल. या क्षेत्रात उभे राहण्यासाठी तुम्हाला कालानुरूप तंत्रज्ञानाचा आणि साधनांचा  वापर करावा लागेल. खालील प्रमाणे काही मह्त्वाच्या रणनीती दिलेल्या आहेत ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या डिजिटल मार्केटिंग रणनीतींमध्ये करायला हवा


. तुमच्या मार्केटिंगच्या प्रक्रियेला स्वयंचलित करा

तुमच्या मार्केटिंगच्या कार्यांना स्वयंचलित करण्याकडे तुम्हाला ध्यान द्यावे लागेलयामुळे नक्कीच तुमचा वेळ आणि कष्ट वाचतील. यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी मदत होते. तसेच तुम्ही ईमेल मार्केटिंगची मोहीम सुद्धा तयार करू शकता. यामुळे तुम्हाला सानुकूलित मेल्स पाठवण्यात मदत होते. चॅटबोट  हे  २०२० मधील  अजून एक रियाल इस्टेट मार्केटिंगचे उपयोगी साधन आहे. यामुळे तुमच्या ग्राहकांना तुमच्या वेबसाईटवर अर्थपूर्ण संभाषणात व्यस्त होण्यास परवानगी मिळते. यामुळे त्यांच्या प्रश्नांचे निराकरण सुद्धा पटकन होते. त्यासोबत तुमच्या कार्याला अनुकूलित  करण्याआधी त्याला तपासून आणि पडताळणी करून पहा. त्यासोबत दुसरीकडे तुम्हाला मानवी संबंधांकडेही लक्ष द्यावे लागेल

. तुमच्या कंटेन्टची जाहिरात करण्यासाठी विडिओ कंटेन्टचा वापर करा.

संभाव्य घर खरेदी करणारी  युवा पिढी सहसा विडिओ कंटेन्ट पाहून प्रभावी होतेखरंतर हा ट्रेंड कधीच कमी होणार नाही. जसेकी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरील लाईव्ह विडिओच्या मार्फत तुमच्या ग्राहकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे देऊ शकता. तुमच्या घराचा प्रवास आणि वर्णन करणारा विडिओ तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अपलोड करू शकता. तुमच्या संभाव्य ग्राहकांसोबत जुळण्याचा हा उत्तम मार्ग आहे. त्यासोबत तुमच्या मित्रमंडळींना, शेजाऱ्यांना प्रशंसा पत्रे देण्यासाठी सांगु शकता. तुमच्या विडिओच्या शेवटला तुम्ही क्रिया करण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. उदाहरणार्थ, "संपर्क करा.", " आमच्या मालमत्तेला भेट द्या." 

. ब्रॅंडिंग करण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंगचा वापर करा

तुम्ही कंटेन्ट  मार्केटिंग रणनीतीचा समावेश केला आहे का? उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करणे अगदी आवश्यक आहे. तुम्ही सतत आकर्षक ब्लॉग  पोस्ट तयार करून शेअर करायला हवे. उदाहरणार्थ, घर खरेदी आणि विक्रीच्या सूचना. जो ब्लॉग तुमच्या शहराबद्दल  आणि शहराच्या जीवनशैलीबद्दल माहिती देतो तो ब्लॉगही उपयोगी ठरतो. त्यानंतर तुमच्या वेबसाईटवर "हाऊ टु" गाईड पोस्ट करू शकता. इतर उदाहरणांमध्ये आर्थिक सूचना आणि व्हाईटपेपरचा समावेश होतो. म्हणजेच तुमच्या ग्राहकांना काय हवंय हे तुम्ही समजून घ्यायला हवं. आणि त्यानुसार उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करावा लागेल

. सोशल मीडियाचा उत्तम वापर करा

जेव्हा आपण सोशल मीडियाचा योग्य वापर करतो तेव्हा ते रिअल इस्टेट मार्केटिंगचे प्रभावी साधन बनते. २०२० मध्ये तुमच्या श्रोत्यांसाठी सोशल मीडियावर जुळणे अत्यंत महत्वाचे आहेसगळ्यात पहिला तुम्हाला तुमचे फेसबुकवर रिअल इस्टेटचे व्यावसायिक पेज तयार करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या रिअल इस्टेट सेवांची जाहिरात करण्यासाठी या पेजचा वापर करू शकता. तुम्ही फेसबुकवर आकर्षक ग्रुप्स तयार करू शकतातुमच्या मालमत्तेचे व्यावसायिक फोटोच तुम्ही पोस्ट कराल याची खात्री घ्या. तुमच्या मालमत्तेचे नूतनीकरण सुद्धा तुम्ही दाखवू शकता. तुमच्या ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्यासमोर तुम्हाला  एक तज्ञ म्हणून तुमची प्रतिमा प्रस्थापित करावी लागेल. त्यासोबत तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत इतर वासलेवारांशी संपर्कात राहू शकता

. इंफ्लुएन्सर बना 

एक रिअल इस्टेट एजेंट  म्हणून तुम्हाला तुमची विश्वास पात्रता सिद्ध करावी लागते. म्हणजेच तुमच्या निशाण्यातील  ग्राहकांना तुम्ही प्रभावित करायला हवे. गुगलच्या पहिल्या पानांवर तुमचे ब्रँड दिसत आहे का? जर नाही, तर तुम्हाला तुमच्या रिअल इस्टेट मार्केटिंग रणनीती अपडेट कराव्या लागतील. जसेकी अनेक खरेदीदारांचा ऑनलाईन रिव्युव्हर विश्वास ठेवण्याकडे कल असतो. तुमच्याशी खुष असणाऱ्या ग्राहकांनी तुमच्या कामाबद्दल कमेंट केला आहे याची खात्री करून घ्या. तुम्ही स्थानिक वर्तमान पात्रात आणि स्थानिक लेखांमधून पोस्ट करू शकता. त्यासोबत तुम्ही मार्केटिंगची सर्जनशील  मोहीम चालवून तुमचे कौशल्य दाखवू शकता. जे  तुमचे  स्पर्धक वापरत  नसतील  अश्या काही नवनवीन रिअल इस्टेट मार्केटिंगच्या कल्पना घेऊन तुम्हाला समोर यावे लागेल

"तुम्ही कधीही वाईट पानाला सुधारू शकता पण कोऱ्या पानाला सुधारू शकत नाही. -जोडी पिकॉल्ट "

शेवटचे विचार

वरील महत्वाच्या ट्रेंडचा तुमच्या  मार्केटिंगच्या मोहिमेमध्ये सामील समावेश केला आहे का? या रिअल इस्टेट मार्केटिंगच्या कल्पना इतर वासलेवारांपेक्षा  अग्रेसर राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत करतील. त्यासोबत तुमच्या मार्केटिंगच्या आरओआयचा  सतत ट्रॅक ठेवावा लागेल. म्हणजेच तुमची रणनीती तुम्हाला फायदा देत आहे की फक्त त्याची  किंमत द्यावी लागत आहे हे तपासून पाहावे लागेल. त्यासोबत तुमच्या वेबसाईटवर किवर्डस केंद्रित कंटेन्टचा समावेश असेल याची खात्री  घ्या. यामुळे तुमच्या रिअल इस्टेट मार्केटिंग कंपनीची गणना वाढेल. अनेक लोकांना विश्वासपात्र लोकांसोबत व्यवहार करायचा आहे. त्यासाठी कश्याप्रकारे  तुम्ही घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी बनवू शकता हे स्पष्टपणे समजावून सांगावे लागेल. तुमच्या मार्केटिंगच्या ध्येयांना निश्चित करा आणि आताच तुमच्या कामाला  सुरुवात करा.    

 Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon