सध्याची आर्थिक परिस्थिती पहिली तर प्रत्येत लहान आणि मोठे व्यवसाय हे वेगवान आणि कार्यक्षम स्वरूपात व्यवसायाची जाहिरात करण्याकडे वळले आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, व्हाट्सअप ही काही सोशल मीडिया मार्केटिंगची( social media marketing (SMM)) व्यासपीठे आहेत जिथे जाहिरात ही एका विशिष्ट शिखरांवर असते. आपण टार्गेट केलेल्या लोकांशी पटकन संबंध साधल्यामुळे लहान प्रमाणाच्या व्यवसायांची जाहिरात करणे ही उत्तम योजना बनते. एसएमएमला जास्त प्रमाणात आच्छादाण्यासाठी वेळ आणि चाचणी केलेल्या पद्धतींनी चांगला मार्ग काढला आहे. खालील प्रमाणे छोट्या व्यवसायांसाठी काही सोशल मीडिया मार्केटिंगच्या ५ सूचना दिलेल्या आहेत ज्या लहान व्यवसायाला विश्व व्याप्ती जाळ्यावर (World Wide Web) दृष्टीस पडण्यास मदत करतील. कमी-मोठे व्यवसाय सोशल मीडिया ऑप्टिमाइझेशन गाईडलाईनचा (social media optimization guidelines) वापर करून मोठे झाले आहेत. तर हे नक्की तपासून पहा.
१. सोशल मीडिया प्रायझिंग (Social media pricing)- काय किंमत आहे?
सोशल मीडियामुळे व्यापकता वाढते. त्यामुळे लहान व्यवसायांसाठी सोशल मीडिया प्राइझिंगचा विचार केला तर जास्त आहे. तुम्ही सत्यापासून किती दूर आहात ? होय. ही आश्चर्यकारक वस्तुस्तिथी आहे की क्वचितच काही प्रमाणात सोशल मीडिया मार्केटिंग सारख्या प्रकारात पैसा गुंतवलेला असतो. जर तुमचा लहान व्यवसाय आहे आणि तुम्ही अश्या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये पहिल्यांदा उतरावे की नाही याचा विचार करत आहात तर तुमची सगळी काळजी बाजूला ठेवा. तुम्हाला काही करावं लागेल ते म्हणजे फ्री साईटवर साइन-उप करा आणि सुरुवात करा. तसेच अनेक मीडिया प्लॅटफॉर्म( फेसबुक, लिंक्डइन,ट्विटर इत्यादी) मध्ये नाममात्र खिशातून अनुकूल पैसा ( nominal pocket-friendly fee) घालावा लागतो जिथे तुमच्या वेबसाईटची सर्च एंजिनाच्या पहिल्या पेजवर गणना करण्याच्या कामासाठी आणि सगळ्यांना वेबसाईट दिसण्यासाठी व्यावसायिकांना पैसे द्यावे लागतात. आकर्षक आहे ना? तुम्ही स्वतःचा सुद्धा यात सामावेश करू शकता. ही सर्वात स्वस्त जाहिरातीचे चॅनेल्स आहेत.
२. सोशल मीडिया ऑप्टिमाइझेशन (Social media optimization)- एससीओ ने हे कार्य सोडले आहे कां?
छोट्या व्यवसायांसाठी मार्केटिंग कॅम्पेनमध्ये भाग घेण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करा. सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (Search Engine Optimization (SEO)) हे तंत्रज्ञान अजूनही वर्चस्व गाजवत आहे. पण त्याच बरोबर एसएमओ मॉड्युल ऑपरंडी (SMO modus operandi) सुद्धा आहे. त्याने स्वतःची सगळ्यात फायदेशीर भागीदारी करणारी सेवा अशी खून बनवली आहे. सोशल मीडिया ऑप्टिमाइझेशन लहान व्यवसायासाठी परिणामकारक आणि कमी त्रासदायक आहे. यामुळे जलद वेगाने जास्त दृश्यमानता येते. ब्लॉग्स लिहिणे, युट्युब चॅनेल जोडणे, किंवा फक्त ट्विटरवर कमेंट पोस्ट करा आणि तुम्ही सगळ्या गोष्टी बघण्यासाठी इंटरनेटवर असाल. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ नसेल तर कमी दरात उत्तम सेवा पुरवणाऱ्या व सोशल मीडियावर काम करण्यासाठी हौशी असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करा आणि ते तुमच्या ब्रँडला यॊग्य मार्गावर आणतील . काही लोक असेही आहेत ज्यांना पोस्ट्सची खिल्ली उडवण्यासाठीसुद्धा पैसे दिले जातात. नकारात्मक जाहिरात हा वादग्रस्त विषयातून लक्ष वेधून घेण्याचा दावा करण्याचा सिद्ध झालेला प्रकार आहे. काही लोक त्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. तुम्ही कोणत्या बाजूला आहात? चांगली की वाईट?
३. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म- तुम्हाला किती हवे आहेत?
लहान व्यवसायांच्या ऑनलाईन मार्केटिंगसाठी योग्य संख्येत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत का? जर आहेत तर ते कोणते आहेत? अशा अनेक साईट्स आहेत ज्या लोकांचं कुतूहल वाढवून त्यांना साईटवर भेट देण्यास आमंत्रित करण्यासाठी उत्तम मार्ग सुचवतात. तुम्ही त्यातल्या किती निवडता याला मर्यादा नाही. काहींनी आपली अशी मजबूत उपस्थिती स्थापन केली आहे की लहानग्या मुलांना सुद्धा त्यांचं नाव माहित आहे. जसंकी फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर गूगल प्लस इत्यादी. छोटया व्यवसायांच्या सोशल मीडिया मार्केटिंगसाठी अग्रेसर सूचना आहे की भरभराटीसाठी तुमच्या ब्रँडसाठी वेबसाईटची सुरुवात करा. पोस्ट्स, ब्लॉग्स, चॅट्स, फोटो शेअर,विडिओ अपलोड करून आणि इतर वेगवेगळ्या प्रसिद्ध ठिकणी त्याच्या संबंधित जाहिरात करून वेबसाईटचा पाठपुरावा घ्या. जेवढ्या लोकांशी तुम्ही जुळलं तेवढे तुम्ही लोकांच्या दृष्टीस पडलं आणि त्यामुळे तुमचे ब्रँड चमकेल. खालील गोष्ट तयार करा आणि तुमच्या व्यवायावर त्वरा करा. आकाश मर्यादा आहे!
"जे कष्ट न घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन "
४. सोशल मीडिया मॅनेजर- तुम्हाला एखादी व्यक्ती नेमण्याची खरंच गरज आहे का?
ब्रँड रिप्रेझेन्टेशन (Brand representation)- ब्रँड रिप्रेझेण्टेशन हा तुमच्या उध्योगाची जाहिरात करण्यासाठी एक किवर्ड आहे. लहान व्यवसायांच्या उभारणीसाठी आणि त्यांचे नाव जगभरात पसरवण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजरची नेमणूक करण्यापेक्षा जास्त चांगला कोणताही पर्याय असूच शकत नाही. आपल्या आवश्यकतेनुसार योग्य माणसाची निवड करण्यासाठी बनबलेली यादी ही तुमच्या सोशल मीडिया मार्केटिंगच्या गरजांची काळजी घेण्यास योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत करते. संभवनीय ग्राहकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी आपल्या निशान्यात कोणती जाणता आहे माहित करून घेणे आणि त्यांच्याशी संबंध जोडणे ही पहिली पायरी आहे. एकदा ठसा उमटला की मग सोशल मीडिया मार्केटिंगमधील कल्पनांच्या माध्यमातून लिंकची देखरेख करणे हे मॅनेजरचे कर्तव्य आहे. कंटेन्ट डिसाईनिंग पासून ई-मार्केटिंग पर्यंत सगळं काम मॅनेजरला सांभाळावे लागते. तुमचा व्यवसाय जगभरात पसरवण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करा.
५. सोशल मीडिया रणनीती- हे मार्केटिंगचे उत्तम साधन आहे की काय आहे ?
छोटया व्यवसायांसाठी अचूक सोशल मीडिया रणनीती ही तुमच्या व्यवसाय किंवा ब्रँडची प्रतिमा वाढवण्यासाठी योग्य उपाय आहे. जितके जास्त सोशल मीडिया तंत्रज्ञानावर काम करणे सोपे आहे तितकेच ते कंटाळवाणे वाटते. भरपूर वेळ सोशल मीडियावर ऑनलाईन उपस्थिती आणि दृश्यमानता बनवण्यासाठी जातो. तर सोशल मीडिया रणनीतीचे नियोजन करून आमलात आणण्याची ही वेळ आहे. संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ तयार करायचे ध्येय डोक्यात ठेवा जिथे लोक चर्चा ,निरीक्षण,संभाषणासाठी आणि करण्यासाठी एकत्र येतील. ब्रँडची प्रतिमा पुढे नेण्यासाठी पाया स्थापन करणे हे निर्णायक आणि युक्तीचे काम आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीवर प्रकल्प आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करणार हे ठरवा. तुमच्या व्यवसायाच्या ऑनलाईन दृश्यमानतेची रणनीती ही व्यवसाय क्षितिजापर्यंत विस्त्रुत करण्याची किल्ली आहे. योजना सुरू करा!
सोशल मेडियांसाठी योजना- प्रत्येकाकडे एक योजना आहे मग तुमच्याकडे का नाही?
*पहिली पायरी आहे की तुमचे कंटेंडर्सचा पाठपुरावा घ्या आणि ते काय करत आहेत याचे विश्लेषण करा. त्यांच्यात डोकावण्याची भूमिका घ्या आणि बघा की ते तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी काय करत आहेत.
* दुसरी पायरी चढा आणि लोकांबद्दल अभ्यास करा. ब्राउजिंग करण्याच्या सवयी, त्यांना कोणत्या वस्तू अवडतात व आवडत नाहीत इत्यादी. शोधण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसंकी आरएसएस फीड्स( RSS feeds), सोशल नेटवर्किंग, आणि इतर ऑनलाईन मार्केटिंगची माध्यमे आहेत. त्यांचा योग्य वापर करा.
* तिसरी पायरी आहे ती म्हणजे लोकांमध्ये आढळणाऱ्या साम्यानुसार त्यांचे वेगवेगळे संघ तयार करा. जाहिरातीच्या कंटेन्टमधून मोलाचे वजन वाढवा . ट्विटरच्या माध्यमातून घाला आणि माहितीसोबत जाहिरातींच्या पोस्ट्स मधील टक्केवारीचे समतोल राखा.
अखेरीस काही जर महत्वाचं आहे तर ते तुमचं ब्रँड. अभ्यास करा आणि कृती करा.
छोटे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि जगभरात असंख्य मोठया प्रमाणात होणाऱ्या इंटरनेटवरील जाहिरातीसाठी सोशल मीडिया मार्केटिंग ही सगळ्यात उत्तम सूचना आहे.
Penned By: Ankita Kadam
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon