Tuesday, September 3, 2019

तुमच्या रिअल इस्टेट सेवांची जाहिरात करण्यासाठी ब्लॉगिंग महत्वाचे आहे का?

तुमच्या ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळवून देण्यास तुम्हाला आवडतं का? पण तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचे रूपांतर ग्राहकांमध्ये करण्यात  तुम्ही असमर्थ ठरत आहात का? जास्तीत जास्त लोक आधी ऑनलाईन घर खरेदी करू पाहतात. रिअल इस्टेट एजेंटची ऑनलाईन उपस्थिती असायला हवी. प्रभावी रिअल इस्टेट ब्लॉग्स आपल्याला अनेक फायदे मिळवून देतात. ब्लॉग्स मधून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संबंधित अनुभव आहे याची लोकांना खात्री पटते. रिअल इस्टेटसाठी केलेली ब्लॉगिंग म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेला प्रभावी खर्च होय. 

तर मग चला सुरुवात करा. 

तुमच्या रिअल इस्टेट ब्लॉगसाठी अत्यंत हुशारीने विषय निवडा. असा विषय निवडा जो लोकांना समजून घ्यायचा आहे. जर ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला रस नसेल तर तुम्हाला काळजी घ्यायची काहीही गरज नाही. तुमच्या रिअल इस्टेट कंटेन्ट राईटींगचे काम तुम्ही रिअल इस्टेट कंटेन्ट राईटींग एजेंसी कडून बाह्यस्तोत्राच्या साहाय्याने करून घ्या. रिअल इस्टेटसाठी ब्लॉगिंग करण्याचे महत्वाचे फायदे खालील प्रमाणे दिलेल्या आहेत. 

एकदा जर तुमच्या या कामावर हात बसला तर तुम्ही ब्लॉग्सचे प्रकाशन सुरु करू शकता.  ब्लॉग्स लोकांच्यामध्ये तुमच्यावरील विश्वसनीयता वाढवतो. त्यासोबत ब्लॉगिंग सुरु करण्याआधी काही ब्लॉगिंग बद्दलच्या सूचनांवर नजर टाका. 
रिअल इस्टेटसाठी ब्लॉगिंगचे महत्व. 

रिअल इस्टेट कंटेन्ट तुमच्या संभवनीय ग्राहकांवर  चांगला परिणाम करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट  आहे. तुम्हाला फक्त तुमच्या ब्लॉगगिंगला रिअल इस्टेट मार्केटिंगच्या रणनीतींमध्ये समावेश करण्याची गरज आहे. रिअल इस्टेटसाठी ब्लॉगिंग करण्याचे फायदे खालील प्रमाणे दिले आहेत. 

तुमच्या साईटवर अधिक ट्रॅफिक मिळावा. 

 इस्टेटसाठी ब्लॉगिंग करणे ही ग्राहकांना आकर्षित करण्याची प्राथमिक पायरी आहे.  रिअल इस्टेट बद्दल ज्या  विषयावर लोकांना माहिती हवी आहे त्या विषयांवर तुम्हाला रिअल  इस्टेट ब्लॉग्स लिहावे लागतील. तुमच्या सर्च इंजिनाची विसिबिलीटी वाढवण्यासाठी तुम्हाला कमीतकमी दर आठवड्याला एक ब्लॉग पोस्ट करावा लागेल. याशिवाय ब्लॉग बनवताना तुम्हाला काही एसइओ( SEO) नियम लागू करावे लागतील. त्याबरोबरच ज्यातून सर्च  इंजिनमधे  लिहिल्या किंवा शोधल्या गेलेल्या प्रश्नांची उतरे लोकांना मिळतील असे विषय शोधा आणि त्यावर ब्लॉग्स लिहिण्याचा प्रयत्न करा.  

"उत्तम ब्लॉग असावा यावर लक्ष केंद्रीत करू नका. असा ब्लॉग बनवण्याकडे लक्ष केंद्रीत जो तुमच्या वाचकांसाठी उत्तम ब्लॉग असेल. - ब्रायन क्लार्क " 

सोशल मीडियावर तुमच्या रिअल इस्टेट सेवांची जाहिरात करा. 

तुमच्याकडे कदाचित तुमचे रिअल इस्टेटचे व्यावसायिक पेज फेसबुकवर असेलच. पण तुमच्या व्यवसायाच्या निगडित माहितीपूर्वक कंटेन्ट तुम्ही शेअर करताय का? सातत्याने तुम्ही उत्तम घरांची आणि घर मालकांची छायाचित्रे शेअर करायला हवी. जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर लोकांना गुंतवून ठेवेल असा कंटेन्ट शेअर करता तेव्हा लोक कदाचित तुमच्या वेबसाईटवर सुद्धा भेट देतात. 

रिअल इस्टेटसाठी केलेली ब्लॉगिंग तुमचे कौशल्य सिद्ध करते. 

रिअल इस्टेटसाठी ब्लॉगिंग हा व्यक्त करण्या ऐवजी दर्शविणारा सर्जनशील दृष्टिकोन आहे. तुमच्या संभाव्य ग्राहकांसोबत तुमचे कौशल्य का वाटू नये? तुमची प्रक्रिया काय आहे हे लोकांना दाखवायला हवी. आणि तुमच्या व्यवसायात प्रविण आहात हे सिद्ध करायला हवे. त्यासाठीच असे ब्लॉग पोस्ट करा ज्या
कंटेन्ट मधील पायऱ्यांचे अनुसरण करून लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर शोधण्यासाठी मदत होईल.एकदा जर तुम्ही  ब्लॉगिंगमधुजन तुमची विश्वासपात्रता सिद्ध केलात तर लोकांचा तुमच्यावर विश्वास ठेवण्यावर कल वाढेल. खासकरून  बि2बि मार्केटर्स (B2B marketers)साठी ब्लॉगिंग खूप महत्वाची आहे. 

खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना त्वरित कृती करण्यासाठी प्रोत्सहीत करा. लोक खरेदी/विक्री करावी की नाही या गोष्टीवर ठाम नसतात. तुमच्या ग्राहकांना खात्री पटवून देऊन त्वरित कृती करायला लावण्यासाठी एक प्रभावी ब्लॉग हा उत्तम मार्ग आहे.  तुमचा ब्लॉग तुमच्या संभाव्य ग्राहकांना असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. त्यामुळे तुम्हाला  वारंवार सारखीच उत्तरे द्यावी लागत नाहीत. तुमचा जो ब्लॉग सर्च इंजिनमध्ये सगळ्यात वरती दिसतो त्याच्याकडे तुमच्या श्रोत्यांना ग्राहकांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असते. 

"अस्सलपणा आणि निष्ठा हे ब्लॉगिंगचे चलन आहे. - जेसन कॅलाकेनिस " 

रिअल इस्टेट लीड्सचे व्युत्पन्न आणि संगोपन करा. 

रिअल इस्टेट मार्केटिंग कंपन्यांनी रिअल इस्टेट मार्केटिंगसाठी नवीन कल्पना घेऊन समोर यावे. होर्डिंग्स आणि वर्तमान पात्रातील जाहिराती या सारख्या पारंपरिक पद्धती आजकाल तितक्या प्रभावी राहिल्या नाहीत. पारंपरिक पद्धतीपेक्षा ब्लॉगिंग जास्त प्रमाणात लीड्सचे व्युत्पन्न करते. अनेक लोक वाचनातून शिकण्याला प्राधान्य देतात. एकदा जर का तुमच्या कंटेन्ट मुळे लोक प्रभावित झाले तर नक्कीच ते तुमच्या पर्यंत येऊन पोचतील. म्हणजेच ब्लॉगिंग तुमच्या बहुधा ग्राहकांना निशाणा बनवण्यास मदत करते.   

ब्लॉगिंग- रिअल इस्टेट सेवांची जाहिरात करण्यासाठी एक प्रभावी खर्चाचा मार्ग आहे. 

 रिअल इस्टेट सेवांची जाहिरात करण्यासाठी ब्लॉगिंग हे  परवडणारे माध्यम आहे. तसेच ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया या दोघांचाही वापर करा. तुम्हाला एक विषय निवडायला हवा जो सोशल मीडियायावर बहुधा जास्त प्रमाणात शेअर केला जातो.  यामुळे तुमचे रिअल इस्टेटचे ग्राहक वैयक्तिकृत रित्या तुमच्यात गुंतून राहतात. त्यासोबत नवीन घरांची  कस्टमाईज्ड लिस्टिंग(customized listings ) तुम्ही करू शकता. तुमच्या नवीन पोस्ट केलेल्या ब्लॉग बद्दल तुमच्या ग्राहकांना माहित असावे. एकदा जर तुम्ही ब्लॉग्गिंगच्या कलेत प्राविण्य मिळवलंत तर तुम्ही लोकांना निशाणा बनवण्यासाठी असणाऱ्या इतर मार्गांवर तुम्ही लक्ष घालू शकता. त्याचसोबत तुम्ही ईमेल लिस्ट बनवून तोच कंटेन्ट अनेक लोकांना शेअर करू शकता. 

 Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon