आपल्या निशान्यातील श्रोत्यांना आकर्षित करण्याच्या आणि ग्राहकांकडून लाभदायक प्रतिसाद मिळवण्याच्या ध्येयासाठी आकर्षक, संबंधित आणि मौल्यवान कंटेन्टची निर्मिती आणि वितरण करण्यालाच कंटेन्ट मार्केटिंग असे म्हणतात.
प्रभावी कंटेन्ट मार्केटिंग सेवा जसे की उपयुक्त,शैक्षणिक आणि मनोरंजक माहिती योग्य सोशल मीडियातील व्यासपीठांवर शेअर केल्याने तुमचा व्यवसाय असंख्य प्रमाणात वाढवण्यासाठी मदत होते.
तुमच्या ब्रँडचे मार्केटिंग करण्यासाठी आणि स्पष्ठपणे पारिभाषित करणाऱ्या ग्राहकांना राखून ठेवण्यासाठी एक प्रभावी कंटेन्ट मार्केटिंग रणनीती अगदी फायदेशीर ठरते. कंटेन्ट मार्केटिंगच्या प्रकारांत ऑनलाईन आणि ऑफलाईन कंटेन्ट मार्केटिंगची उदाहरणे ज्यात जे त्यांची रणनीतींचा समावेश करू शकतात अश्या गोष्टींचा समावेश असतो.
त्यानंतर तुमच्या सध्याच्या कंटेन्टची कामगिरी तपासण्यासाठी आणि ज्या युक्त्या काम करत नाहीत त्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी गुगल अँनाल्याटिकस मदत करते. कंटेन्ट मधील दोन समान तुकड्यांमध्ये काही चाचण्या केल्याने सध्याच्या कंटेन्ट मार्केटिंग रणनीतीच्या पुनरावृत्तीसाठी विषयाच्या संबंधीत महत्वाची माहिती एकत्रित करण्यासाठी मदत होते. तुम्ही बाहेरील कंटेन्ट मार्केटिंग एजेंसीच्या सहाय्याने बाह्यस्तोत्रातून सुद्धा कंटेन्ट घेऊ शकता. बाहेरील कंटेन्ट मार्केटिंग एजेंसीच्या सहाय्याने बाह्यस्तोत्रातून सुद्धा कंटेन्ट घेण्याचे फायदे अधिक जाणुन घ्या.
कंटेन्ट मार्केटिंग महत्वाची का आहे?
तुमच्या व्यवसायाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि तुमच्या श्रोत्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल शिक्षण देण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंग महत्वाची आहे. पारंपारिक मार्केटिंग जाहिरातींची युक्ती थेट खरेदी चक्राच्या विचार आणि निर्णय या टप्यांशी करार करतात.
तुमची सध्याची कंटेन्ट मार्केटिंग रणनीती सुरुवातीच्या टप्प्यातील खरेदी प्रक्रियेवर काम करत असते. उदाहरण, एखाद्या ब्रँड बद्दल जागरूकता वाढवणे. जेव्हा मार्केटिंग रणनीती योग्य रितीने अमंलात आणली जाते तेव्हा आपण कोणीही उल्लेखनीय आरओआय( ROI) अनुभवू शकतो.
त्यासोबतच विविध प्रकारचे कंटेन्ट मार्केटिंग इतर डिजिटल मार्केटिंग चॅनेल्स जसेकी सोशल मीडिया मार्केटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यांचे समर्थन करतात. कंटेन्ट मार्केटिंग सेवांचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्या वेबसाईटच्या गणतीला चालना देतात.
यशस्वी कंटेन्ट मार्केटिंग रणनीतीसाठी काही मुख्य पायऱ्या ज्यांचे अनुसरण करायला हवे त्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
* तुमच्या मार्केटिंग मधील ध्येयाचे अनुसरण करून त्यानुसार थोडक्यात कंटेन्ट मार्केटिंगची रचना करणे.
* ग्राहकांची भूमिका तयार करून निशान्यातील लोकांना समजून घेणे.
* वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेन्टचे विश्लेषण करून तुमच्या व्यवसायाला जो अनुरूप असेल तो कंटेन्ट घेणे आणि सातत्याने उच्च गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करणे.
* सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर मौल्यवान कंटेन्टची जाहिरात करणे.
* खरेदी चक्राच्या प्रत्येक टप्प्यात कंटेन्ट मार्केटिंगचा समावेश करणे.
* कंटेन्ट मार्केटिंग रणनीतीमध्ये ग्राहकांना गुंतवण्याचे विविध मार्ग शोधुन काढणे.
उदाहरणार्थ, युसर जनरेटेड कंटेन्ट (user generated content)
* दररोज कंटेन्ट मार्केटिंगच्या ध्येयांना पुन्हा पुन्हा सुधारित आणि मूल्यमापन करणे
"तुम्ही कधीही वाईट पानाला सुधारू शकता पण कोऱ्या पानाला सुधारू शकत नाही. -जोडी पिकॉल्ट "
ग्राहकाच्या प्रवासानुसार कंटेन्टचे चित्रण करणे.
खरेदी चक्राच्या प्रत्येक टप्प्यात कंटेन्ट तयार करणे हा कंटेन्टचे चित्रण करण्याचा मुख्य पैलू आहे. काही लोक पटकन प्रोडक्ट खरेदी करतात. तर दुसऱ्या बाजूला लोक वेबसाईटला भेट देतात आणि प्रोडक्ट शोधतात आणि त्यानंतर प्रोडक्ट खरेदी करतात. धोरणात्मक रितीने एखाद्या संभावनेला खरेदीच्या टप्प्याच्या दरम्यान मार्गदर्शन करणे अधिक निर्णायक आहे. खरेदीच्या प्रक्रियेतील विविध टप्पे खालील प्रमाणे दिलेले आहेत.
* जागरूकता निर्माण करणे- विस्तृत प्रमाणात श्रोत्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंग हा उत्तम साहाय्यक आहे. आणि कंटेन्ट मार्केटिंग मधील HubSpot हबस्पॉट आणि एससीओ SEO हे महत्वाची भुमिका बजावतात.उच्च स्तरीय मेट्रिक्स जसे की उत्कृष्ट कार्यरत पेजेस आणि आपल्या पेजचे असणारे व्युस, वाचकांची संख्या, प्रतिबद्धतेचा दर आणि आर्टिकल बघणाऱ्यांची संख्या या गोष्टी लोकांना गुंतवुन ठेवणारा कंटेन्ट तयार करण्यात मदत करतात.
* गृहीत धरले जाणारे टप्पे - या टप्यात ग्राहक एका प्रोडक्टला इतर ब्रँडशी तुलना करून पाहतात. आणि गुणवत्ता आणि किंमत तपासून पाहतात. ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ईबुक, सुसंगत वृत्तपत्रे, उच्च वचनबद्धतेचे किवर्डस, मोठमोठे किवर्डस चा कंटेन्ट तयार करायला हवा.
* निर्णय घेतला जाणारा टप्पा- या टप्यात ग्राहक ब्रँडवर विश्वास ठेवण्याच्या निर्णय घेतात आणि प्रोडक्ट खरेदी करतात. ऑर्डर करण्याची वारंवारता, ऑर्डरचा साईझ, विक्रीचा आढावा घेणे ही सुद्धा महत्वाची भूमिका बजावणारी कार्ये आहेत. त्यानंतर आकर्षक सीटीएस (CTAs-CREATE TABLE AS SELECT), सूट देणे, स्पेशल ऑफर्स, फ्री ट्रायल सुद्दा अधिक फायदेशीर ठरतात.
कंटेन्ट मार्केटिंगची उदाहरणे
मौल्यवान कंटेन्टची मार्केटिंग पुष्कळ आकर्षक स्वरुपात होऊ शकते. ब्लॉग आर्टिकल्स, युट्युब विडिओज, पॉडकास्ट्स रेकॉर्डिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल्स, वेबिनार्स, इन्फोग्राफिकस, कार्टून्स, क्विझेस, जनरेटर्स, कॅल्क्युलेटर्स, असेसमेंट्स आणि डाउनलोडेबल गाईड्स आणि अँप ही कंटेन्ट मार्केटिंगची काही
सामान्य उदाहरणे आहेत. कंटेन्ट मार्केटिंग ही आपल्या निशान्यातील लोकांपर्यंत पोहोचण्याकडे कंटेन्ट मार्केटिंग लक्ष केंद्रित करते. अंतर्गामी मार्केटिंग काही विशिष्ठ खरेदीदारांवर लक्ष केंद्रित करते.
कंटेन्ट मार्केटिंग ब्लॉग्स- रणनीती युक्त ब्लॉगिंग हा कंटेन्ट मार्केटिंगचा मुख्य पैलु आहे. यामुळे तुमच्या ब्रँड बद्दल जागरूकता वाढते. आणि लोकांना मोफत माहिती मिळवण्यासाठी प्रवेश मिळतो. दररोज माहितीपूर्वक व्यवसायाचे ब्लॉग्स शेअर केल्याने तुमच्या संभाव्य वाचकांचे रूपांतर हळूहळू संभाव्य ग्राहकांमध्ये होते. यामुळे लोकांच्या मध्ये विस्तृत प्रमाणात विश्वास निर्माण केला जातो. दर आठवडयाला एक ब्लॉग पोस्ट करणे हा तुमच्या ब्रँडला उभारण्यासाठी उत्तम मार्ग आहे. अनेक लोक तुमच्या ब्लॉगमधील माहितीवर विश्वास ठेवतात. या काही सध्या चर्चेत असणाऱ्या कंटेन्ट राईटींगच्या कल्पना आहेत ज्यांचे तुम्ही अन्वेषण करू शकता. सतत प्रसारण करण्याच्या वेळापत्रकाचे अनुसरण करणे हे श्रोते तयार करण्यासाठी महत्वाचे आहे. इथे सोशल मीडिया महत्वाची भुमिका साकारतो. सोशल मीडिया शेअरिंगसाठी ब्लॉगचे सर्वोत्तमीकरण करणे ही आणखीन एक महत्वाची पायरी आहे. जेव्हा तुमचा कंटेन्ट वाचकांमार्फत शेअर केला जातो तेव्हा तो आपोआप सर्वत्र पसरला जातो. ब्लॉगचे सर्वोत्तमीकरण अनेक मोफत कंटेन्ट मार्केटिंग टूल्सच्या साहाय्याने होऊ शकते. ग्राहकांच्या भूमिकेचा विचार केला की काही विशिष्ठ ग्राहकांना निशाना बनवण्यास मदत होते. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक माहितीचा जसे की आवड/नावड, वय, व्यवसाय,प्रेरणा आणि कमजोर बाजु यांचा समावेश असतो. एका प्रभावी कंटेन्ट मार्केटिंग रणनीतीमध्ये गेस्ट ब्लॉगिंग आणि गेस्ट पोस्टिंगचा समावेश असायला हवा. यामुळे तुमचा अधिकार वाढतो आणि आणि तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक ओढून घेतलं जातं.
इन्फोग्राफिकस- अनुलंब आणि लांब ग्राफिकस ज्यामध्ये चार्ट्स,ग्राफ्स आणि इतर माहितीचा समावेश असतो त्याला त्यालाच इन्फोग्राफिकस असे म्हणतात. व्यावसायिक रित्या रचना केलेले इन्फोग्राफिकस अनेक वर्ष वेबसाईटवर पोस्ट केले जातात आणि सोशल मीडियावर शेअर केले जातात. पिंटरेस्ट आणि मदतनीय इन्फोग्राफिकसचा तुमच्या व्यवसायाच्या संबंधीत विषयांसाठी एक तक्ता तयार केला की तो अधिक फायदेशीर ठरतो. माहिती तयार करण्यासाठी, त्या माहितीचा सारांश लिहिणे आणि मौल्यवान माहिती व्यवस्थित रितीने सादर करण्यासाठी इन्फोग्राफिकस उत्कृष्ठ आहेत. कंटेन्टच्या एका भागाचे संदिग्धपणे फोटोंच्या सहाय्याने स्पष्टीकरण देणे हा इन्फोग्राफिक्सचा मुख्य सार आहे.
पॉडकास्ट- जे आयट्यून्स मध्ये दृश्यमानता आणतात असे पॉडकास्ट हे कंटेन्ट मार्केटिंग मधील निश्चितच शक्तीशाली साधन आहे. यामुळे व्यवसायात विक्री, विनंती आणि प्रवेश वाढतो . पॉडकास्टची जाहिरात ही सुरुवातीला आणि शेवटला होते. आणि यामुळे अनेक लोक आकर्षीत होतात. उद्योजकांची मुलखांत घेऊन त्याचे रेकॉर्डिंग प्रसारित करणे हा कमी वेळेत भव्य यश मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे.
गाईड्स,ईबुक्स,विडिओस आणि ईमेल्स- ज्याठिकाणी ब्लॉग्स हे कंटेन्ट मार्केटिंग चॅनेल्ससाठी प्रवेशद्वार आहेत तेच दुसऱ्या बाजूला गाईड्स,ईबुक्स,विडिओस आणि ईमेल्स हे काही औध्योगीक विषय आणि लोकांचे ग्राहकांमध्ये रूपांतर करण्यासाठी पूर्णपणे संबोधित करण्यासाठी फायदेशीर आहेत. व्यवसायाच्या संबंधित विस्तृत प्रमाणात असणारी माहिती ईबुक्स मार्फत सोयीस्करपणे शेअर करता येते. व्यवसायाबद्दल सतत विचारल्या जाणाऱ्या गोष्टींचा यात समावेश असतो आणि वाचकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. उच्च गुणवत्तेचा, मनोरंजक आणि उत्कृष्ठ विडीओ कंटेन्ट ही तुमच्या सेवांची जाहिरात करण्याची अजुन एक प्रकारची रणनीती आहे. लोकांना आकर्षीत करणाऱ्या विडीओंचा पटकन पसरण्याकडे कल असतो. आणि त्यासोबतच यामुळे तुमच्या ब्रॅंडकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि ट्रॅफिक वाढवण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर वाचकांशी संपर्क साधण्यासाठी माहिती मिळवुन त्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडी मार्फत संपर्क साधने हा उत्तम मार्ग आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ग्राहक तुमच्या वृत्तपत्रांना सबस्क्राईब करतो किंवा तुमच्या ईबुक मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फॉर्म भरतो. जास्तीत जास्त कंटेन्ट शेअर केल्याने अनेक लोक पुढे येतात आणि यांचे पालनपोषण करून त्यांचे ईमेल पाठवण्याच्या मोहिनेतून म्हणजेच जे ईमेल सबस्क्राईबर आहेत त्यांना पाठवणे शक्य आहे त्यांना पाठवून त्यांचे ग्राहकात रूपांतर करून त्यांना विक्री केली जाते.
" जे कष्ट न घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन"
कंटेन्ट मार्केटिंगचे फायदे
पारंपरिक जाहिरातीच्या तंत्रज्ञानाच्या व्यतिरिक्त कंटेन्ट मार्केटिंगचे फायदे खालील प्रमाणे दिलेले आहेत.
कंटेन्ट मार्केटिंग ग्राहकांना मौल्यवान माहिती पुरवते, तेच पारंपरिक जाहिराती या हेतूने सेवा पुरवत नाहीत. सामान्यपणे लोक या जाहिरातींना दुर्लक्ष्य करतात आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा एखाद्या गोष्टी संबंधीत कंटेन्ट ग्राहकांच्या गरजेपर्यंत आणि आवश्यकतेपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांचा काळ तुमच्या ब्रँड आणि प्रोडक्टसोबत नातं बनविण्याकडे असतो. एखादा प्रोडक्ट खरेदी करण्याआधी लोक कदाचित काही महिने कॉपी ब्लॉगर वाचतात. सध्याची मार्केटिंग लोकांना पूर्णपणे शिक्षण देते आणि त्यासोबतच लोकांना तुमचा प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी खात्री पटवून देतो. युट्युब विडिओस आणि लोकांना आकर्षित करणारे ब्लॉग पोस्ट ग्राहकांना खात्री पटवून देण्यासाठी महत्वाची भुमिका साकारतो.
कंटेन्ट मार्केटिंग परस्पर व्यवहार करण्याची जाण तयार करतो. जेव्हा तुम्ही भरीव नसलेला कंटेन्ट पुरवता आणि लोकांना त्यांचे मार्केटिंग कौशल्य सुधारण्यास मदत करता तेव्हा ग्राहकांची परस्पर व्यवहार करण्याची आणि तुमचा प्रोडक्ट खरेदी करण्याची शक्यता अधिक जास्त प्रमाणात वाढते. मोफतमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंग रणनीती खूप फायदेशीर आहे. तुम्ही कदाचित फक्त एक कंटेन्ट मार्केटिंग ब्लॉग पोस्ट प्रसारीत करून अंदाजे ५०० लोकांना आकर्षित करु शकता. रणनीती युक्त नियोजन, लेखन, आणि ब्लॉग पोस्ट हॆ पोस्ट केल्याने एकाला आयुष्यभर फायदा होतो. ब्लॉग पोस्टच्या मार्फत ट्रॅफिक मिळवणे अत्यंत सोयीस्कर आहे. तर तुमच्या ग्राहकांना तुमच्या वेबसाईटकडे आकर्षित करण्यासाठी गुगल अँड्स तुमच्याकडून पैसे घेते. कंटेन्ट मार्केटिंग आयुष्यभरासाठी तुमची मालमत्ता होईल. तेच जाहिरात ही खर्चिक असते.
तुमचे जाळे अधिक वाढवण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर कंटेन्ट शेअर करणे हा अगदी हुशारीचा मार्ग आहेत. जेव्हा लोक तुमचा कंटेन्ट शेअर करतात तेव्हा तो कंटेन्ट सगळीकडे पसरला जातो आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तुमच्या वेबसाईटच्या लिंकपेक्षा एक मौल्यवान कंटेन्ट तयार करणे हे अधिक फायदेशीर ठरते. कंटेन्ट मार्केटिंग एससीओ (SEO) संबंधीत फायदे सुद्धा पुरवतो. लोकांना व्यस्त करणारा, रणनीती युक्त कंटेन्ट तयार करून प्रसारित केल्याने गुगल कडुन अनुक्रमणिका वाढवण्याची शक्यता असते. दररोज ब्लॉग पोस्ट केल्याने तुमच्या वेबसाइटमधील पेजेस वाढतात आणि सर्च इंजिनचे ट्रॅफिक वाढते.
त्यासोबत पॉडकास्ट अपलोड केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रमुख फायदा होतो. लोक तुमचा पॉडकास्ट ऐकतात आणि त्यामागील तुमच्या वेबसाईटची लिंक सुद्धा शोधतात. आयट्यूनवर पॉडकास्ट अपलोड केल्याने अतिरिक्त स्रोत तयार होते आणि काहीही गुंतवणूक न करता ट्रॅफिक मिळवण्याची उत्तम संधी मिळते. कंटेन्ट मार्केटिंग ही मोठया प्रमाणात लक्षित केली जात आहे. कोणीही एखादा कंटेन्ट ग्राहकांसाठी बनवु शकतो आणि काही काळातच निशान्यातील लोंकांचे आकर्षण खेचून घेतो.
निष्कर्ष-
कंटेन्ट मार्केटिंग ही नवीन स्थापित केलेल्या व्यवसायांसाठी आणि इतर प्रकारच्या व्यवसायांसाठी महत्वाचा पैलू आहे. कंटेन्ट मार्केटिंगच्या टप्यांमध्ये तुम्ही जसे आहात तसेच असणे ही तुमच्या ब्रँडला उभारण्यासाठी प्रमुख गुरुकिल्ली आहे. त्यासोबत कंटेन्ट तयार करणे आणि नवीन कंटेन्ट प्रसारित करणे हा तुमच्या ब्रँडची ट्रॅफिक वाढवण्यासाठी लागणारे मुख्य सार आहेत. त्यानंतर तुमच्या कंटेन्ट मार्केटिंगच्या ध्येयांचे आणि उद्दिष्टांचे दर सहा महिन्यातुन पुन्हा एकदा मूल्यमापन करणे.
हे एका यशस्वी व्यवसायाचा अनुभव घेण्यासाठी पूर्णपणे आवश्यक आहे. तुमचे स्वतःचे ब्रँड उभारण्यासाठी सातत्य,चिकाटी आणि परिश्रमाची गरज आहे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्या व्यक्तीने संयंमी राहायला हवे. कोणत्याही अंतर्गामी मार्केटिंग मोहिमेला पूर्ण करून त्यातून काहीतरी हवा तसा निकाल मिळवण्यासाठी ६ ते ९ महिने लागतात.
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon