Monday, December 24, 2018

अग्रेसर रिअल इस्टेट वेबसाईट्स त्यांच्या ब्रँडची जाहिरात कंटेन्ट मार्केटिंगच्या साहाय्याने कश्याप्रकारे करतात ?

 रिअल इस्टेट कंटेन्ट म्हणजे काय? रिअल इस्टेट व्यवसायाची मार्केटिंग करण्याचे 
 मूलभूत प्रकार कोणते आहेत? तुमचे ब्रँडची दृश्यमानता वाढवण्यासाठी तुमचे पहिले पाऊल काय असेल? या सगळ्यासाठी तुम्हाला  गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करावा लागेल. आणि त्यानंतर तुमच्या कंटेन्टची मार्केटिंग करावी लागतेकंटेन्ट मार्केटिंग ही प्रभावीपणे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचण्याची गुरुकिल्ली आहे. मोठया रिअल इस्टेट वेबसाईट्समध्ये  नवीन कंटेन्ट मार्केटिंग कल्पनांना समाविष्ठ करून घेतले  जाते. जर ती ऑनलाईन जाहिरात असेल किंवा ऑफलाईन मार्केटिंग असूदेत लोकांना व्यस्त ठेवणारा कंटेन्ट हा खूप गरजेचा आहे. जे रिअल इस्टेट डेव्हलपर्स ब्लॉगिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करत आहेत ते प्रचंड  निकालाचा अनुभव घेत आहेत. उदाहरणार्थ, विक्री आणि ब्रँडची प्रतिष्ठा तयार होणे  ही एक  सुधारणा आहे. याशिवाय  एक तृतीयांश विक्री ही डिजिटल मार्केटिंग मधुन केली जाते



यामध्ये आव्हान काय आहे?

भरपूर  रिअल इस्टेट डेव्हलपर्स  ऑफलाईन मार्केटिंगचा वापर करतात. त्याचबरोबर काही रिअल इस्टेट डेव्हलपर्सना योग्य डिजिटल  मार्केटिंग चॅनेल वापरण्याबद्दल स्पष्ठ माहित नाही. तथापि काही  रिअल इस्टेट लिस्टिंग वेबसाईट्स  कंटेन्ट मार्केटिंगचा उत्तम वापर करत आहेत.उदाहरणार्थ, मॅजिकब्रिक्स.कॉम   (MagicBricks.com), 99एकर्स.कॉम (99acres.com), हाऊसिंग.कॉम (Housing.com), नेस्टअवे.कॉम (Nestaway.com) आणि इतर

भारतातील अग्रेसर  रिअल इस्टेट  मार्केटिंग कंपन्यांकडून उपयोजीत केल्या जाणाऱ्या कंटेन्टच्या रणनीती

रिअल इस्टेट उध्योगात उभे राहण्यासाठी तुम्हाला शक्तीशाली रिअल इस्टेट   मार्केटिंग रणनीती घेऊन पुढे यावे लागेल. अग्रेसर रिअल इस्टेट कंपन्यांनी कश्याप्रकारे स्वतःला स्थापित केले आहे याची काही उदाहरणे  खालील प्रमाणे दिलेली आहेत

सोभा डेव्हलपर्स

सोभा डेव्हलपर्स यांनी रिअल इस्टेट उध्योगात त्यांचा  मजबूत आणि भक्कम पाया प्रस्थापित केला आहे. त्यांच्या उत्तरदायी आणि योग्य रचना केलेली वेबसाईट त्यांच्या ब्रँडला उत्कृष्ठ बनवते. त्यानंतर त्यांच्या वेबसाईटमध्ये उच्च गुणवत्तेच्या  कंटेन्टचा समावेश असतो जो त्यांच्या प्रकल्पांना अधोरेखित करतो . यामध्ये मालमत्ता शोधण्याची वैशिष्ठे आणि चौकशी अर्जांचा समावेश असतो. त्यांची विविध सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर सातत्याने  उपस्थिती असतात . उदाहरणार्थ, फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम, ट्विटर, पिंटरेस्ट, युट्युब. त्यांच्या  रिअल इस्टेटच्या  मीडिया पोस्टमध्ये सामुदायिक बातम्या,  quotes, माहितीपुर्वक सूचना, त्यांच्या ब्रँडशी निगडीत पोस्ट्स. ते युट्युबवरील विडीओ कंटेन्टचा उत्कृष्ठ फायदा करून घेतात

अर्बन ट्री इंफ्रास्ट्रक्चर

हे ब्रँड सगळ्यात सर्जनशील अश्या  रिअल इस्टेट मार्केटिंग कल्पना अमलांत आणते. ते दररोज  रिअल इस्टेट सोशल मीडियाच्या पोस्ट अपडेट करतात. आणि तोच कंटेन्ट प्रत्येत सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर पोस्ट केला जाईल याची खात्री घेतातसातत्याने  फेसबुकवर  उपस्थिती  दर्शविल्यामुळे त्यांचे ब्रँड प्रतिष्ठित बनते आणि  मोठ्या प्रमाणात लोकांच्या दृष्टीस पडते. सोशल मीडिया पोस्टमध्ये मालमत्तेच्या जाहिराती, ग्राहकांची प्रशंसापत्रे, अनौपचारिक रित्या अद्ययावत करणे, बांधकामाच्या स्थळाची छायाचित्रे,सूट, कार्यालयातील उत्सव आणि इतर. त्यासोबतच स्पर्धा,प्रकल्प प्रक्षेपण मोहीम आणि इतर लोकांना व्यस्त करतील अश्या गोष्टी पोस्ट करतात. लोकांना व्यस्त करण्याचे प्रमाण विविध घटकांमुळे उच्च प्रमाणात असतातउदाहरणार्थ प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमध्ये  त्यांच्या वेबसाईटच्या लिंक, कॉल टु ऍक्शन आणि ध्वनी क्रमांक या गोष्टींचा समावेश असतो. ते नवीन ब्लॉग पोस्ट करतात आणि त्यासोबत जुन्या  ब्लॉग्सचे  त्यांच्या सुसंगततेच्या आधारावर  त्यांची जाहिरात करतात

एस ग्रुप

या  रिअल इस्टेट कंपनीची सिंगल स्क्रोल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट (single scroll responsive website) आहे. आणि ते  जास्त करून फेसबुक आणि ट्विटर येथे सक्रिय असतात. ते फेसबुकवर प्रॉपर्टीचे विडिओ, उपयुक्त सूचना, विविध माध्यमांतील बातम्या आणि विशेष प्रसंगी पोस्ट करतात. तसेच बांधकाम सुरु असलेल्या इमारतींची छायाचित्रे ते पोस्ट करतात. त्यांच्या वॉल वरील कंमेंटला ते चटकन प्रतिसाद देतात. त्यासोबत लिंक्डइनपिंटरेस्ट,गुगल+, युट्युब यांचा ते प्रभावीपणे वापर करतात.

टाटा हाऊसिंग

ही कंपनी आपल्या व्यवसायात  सर्वोत्कृष्ठ  रिअल इस्टेट  मार्केटिंग रणनीतींचा समावेश करून घेते. ही उत्तरदायी आणि गोंधळ मुक्त असणारी वेबसाईट उत्साहपूर्ण कंटेन्ट प्रसारित करते. त्यांचे फेसबुकचे व्यावसायीक  पेज सातत्याने जबरदस्त क्षेत्रफळांची आणि समकालीन घरांची छायाचित्रे अपडेट करत असतात. त्यांनी हॅशटॅग संबंधित प्रभावी मोहिमेचा सुद्धा वापर केला आहे. ट्विटरवर ते त्यांच्या फॉलोवर्स सोबत संवाद साधतात आणि विविध स्पर्धाही ठेवतात. त्यासोबत ते  सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर ब्लॉग पोस्ट  करतात. त्यांच्या युट्युबवर  अपार्टमेंटचे आणि प्रक्षेपणाचे आकर्षक मनोरंजक विडिओ असतात

प्रेस्टीज ग्रुप

हे रिअल इस्टेट ब्रँड  त्यांच्या प्रकल्पांची यादी दाखवणारी लक्षवेधी वेबसाईटचे प्रदर्शन करते.यासोबत त्यांची  फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, पिंटरेस्ट, युट्युब, गुगल+ या व्यासपीठांवर उपस्थिती आहे. त्यांची फेसबुक वॉल लोकांसाठी खुली आहे. आणि त्यांच्याकडून लोकांच्या  कमेंट्स  प्रश्नांना तातडीने प्रतिसाद दिला जातो. आणि फेसबुक पोस्टमध्ये  सामुदायिक बातम्यामाहितीपुर्वक सूचना, प्रकल्प आणि लोकांना व्यस्त करणाऱ्या इतर गोष्टींचा समावेश असतो. त्यासोबत ते गुगल सर्च जाहिरातीसुद्धा चालवतात.तुम्ही

कंटेन्ट मार्केटिंग का काम करते.  

रिअल इस्टेट लिस्टिंग वेबसाईटला कोणती गोष्ट पुढे आणते? ते म्हणजे सरळ स्पष्ठ आणि लोकांना व्यस्त करणारा कंटेन्टगुणवत्तेचा कंटेन्ट ही तुमच्या  रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात करण्याची गुरुकिल्ली आहे? कंटेन्ट मार्केटिंग हे तुमच्या ब्रँडचे दृष्टीपण वाढवण्यासाठी अगदी महत्वाचे आहे. आमच्या कंटेन्टच्या सेवांनी भारताच्या अग्रगण्य रिअल इस्टेट पोर्टल्सच्या वाढीसाठी कश्याप्रकारे योगदान दिले आहे(https://brainsmediasolutions.com/Blog21.html)  ते नक्की बघा. तुमची कंटेन्ट मार्केटींग रणनीती तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यापासून  दूर करत आहे का? तुम्ही नवीन रिअल इस्टेट मार्केटिंगच्या युक्त्यांचे(https://brainsmediasolutions.com/Blog19.html) अनुसरण करायला हवे. तुमच्या कंटेन्टशी निगडित आवश्यकतांना बाह्यस्तोत्रातून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या ब्रँडच्या जागरुतीमध्ये प्रचंड चालनेचा अनुभव घ्या

Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon