आपल्यापैकी किती जणांनी स्वतःच्या स्वप्नातले घर ऑनलाईन शोधले आहे. लोक बहुसंखेने योग्य मालमत्ता शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अनेक घर शोधणारे लोक सर्च इंजिनमध्ये हॅशटॅगशी निगडीत प्रॉपर्टी एंटर करतात. काही लोक सोशल मीडिया फीड्स एंटर करतात. त्यासोबत एखाद्या विशिष्ठ ठिकाणचे स्पष्ट दृश्य समजण्यासाठी आपण विडिओ सुद्धा पाहतो. युट्युब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे सर्च इंजिन आहे. अनेक लोक आसपासच्या परिसरातील गोष्टी आणि घरांबद्दल जाणून घेण्यासाठी या वरील व्यासपीठांचा वापर करतात. आज घर खरेदीदारांसाठी आणि एजेंट्स साठी सोशल मीडियाचा वापर करणे खुप महत्वाचे बनले आहे. या सोशल मीडिया मार्केटिंग मधील सूचना तुमचे काम सोपे बनवतील. आता आपण रिअल इस्टेट सोशल मीडिया मार्केटिंगचे महत्व बघुयात.
१. फेसबुक
जर योग्य प्रकारे वापर केला तर फेसबुक हे तुमच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी अव्दितीय व्यासपीठ आहे. तुमचे रिअल इस्टेट बिसनेस पेज निर्माण करण्यापासून तुम्ही सुरुवात करायला हवी. त्यानंतर तुमच्या लिस्टिंग मधील फोटो विडिओ तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाविषयी ब्लॉग पोस्ट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या संघाचे फोटो टाकता तेव्हा लोक तुमच्यावर जास्त विश्वास ठेवायला लागतात. तुमच्या पेजवरील पोस्टला जे कमेंट येतात त्यांना तत्पर रिप्लाय द्या. सोशल मीडियाच्या रिअल इस्टेट कंटेन्ट मध्ये तुम्हाला उच्च गणतीत आणायची ताकत सर्च इंजिन मध्ये आहे. म्हणून तुमचा रिअल इस्टेट कंटेन्ट हुशारीने निवडा. तुमच्या रियाल इस्टेट सेवांना तत्पर वाढवण्यासाठी फेसबुक हे उत्तम व्यासपीठ आहे याबद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
२. युट्युब
जास्त करून युट्युब विडिओ तेव्हा बघितले जातात जेव्हा आपल्याला हवी असलेली प्रॉपर्टीच्या आपण शोधात असतो. जेव्हा लाखोंच्या संख्येने लोक युट्युबर विडिओ अपलोड करत असतात तेव्हा तुम्ही तुमचा विडिओ इतरांपेक्षा वेगळा कसा बनवाल? तुमचे रिअल इस्टेट चॅनेल काढा आणि त्यावर तुमचा चांगला कव्हर फोटो घाला. आणि विविध चांगल्या प्रकारचे रिअल इस्टेट विडिओ घेऊन या. तुम्ही घर शोधण्याच्या प्रवासाचे तसेच घराच्या शेजारील काही घराबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टींचा विडिओ तयार करा. त्यासोबत तुम्ही स्टेजड घरांची ड्रोन फुटेज घालु शकता. "हाऊ-टु-"(“How-to”) गाईड आणि इंटरव्यु तुमच्या श्रोत्यांना गुंतवून ठेवतात. यामुळे विशिष्ठ प्रमाणात तुमचे व्यूस वाढतात. त्यासोबत रिअल इस्टेट मार्केटिंग रणनीती तुमची प्रतिष्ठा वाढवतात.
३. इंस्टाग्राम
कोणती गोष्ट इंस्टाग्रामला उत्तम सोशल मीडिया मार्केटिंग व्यासपीठ बनवते? तुमच्या पोस्टवर तुम्हाला चटकन अभिप्राय मिळतात. मोठया प्रमाणात वाढत चाललेल्या या व्यासपीठावर तुम्हाला जास्त उपस्थिती दर्शवायला हवी. तुमचा बायो उत्तम ठसा उमटवेल याची खात्री ध्या. यामुळे त्यांना तुमचे बिसनेस अकाउंट फॉलो करणाऱ्यासाठी खात्री पटेल. त्यानंतर तुम्ही कॅप्शन हॅशटॅग वापरण्याचा प्रयोग करू शकता. तुम्हाला इंस्टाग्रामवर उच्च गणतीत यायचे आहे का? त्यासाठी तुम्हाला प्रसिद्ध हॅशटॅगचा वापर करावा लागेल. उदाहरणार्थ,( #RealEstate, #NewListing, #ForSale, #Realtor, #Bungalow) तुमच्या फोटोच्या कॅप्शन मध्ये तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता. यामुळे लोक मनोरंजक संभाषणात समावेश घेतात. त्यासोबत तुम्ही इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोल सुद्धा तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग
"व्यावसायिक लेखक हा एक हौशी व्यक्ती आहे जो कधीच आपले लिखाण सोडत नाही. -रिचर्ड बॅक "
४. ट्विटर
स्थानिक कंटेन्ट, फोटो, विडिओ शेअर करण्यासाठी ट्विटर हे उत्तम माध्यम आहे. तसेच हॅशटॅग ट्विटर वर सुद्धा महत्वाची भुमिका साकारतात. ट्विट्स आणि फोटो जास्तीत जास्त लोकांना गुंतवुन ठेवतात. विक्रीची प्रक्रिया सुरु करण्याआधी परत रिट्विट करा, लोकांना गुंतवा आणि मग रिप्लाय करा. त्यासोबत तुम्ही माहितीची देवाण घेवाण करू शकता. तुमचा कंटेन्ट इतर लोकांना, खरेदीदारांना, विक्रेत्यांना,वासलेवारांना आणि भाडेकरूंना मदत करेल याची खात्री घ्या.
५. लिंक्डइन
तुमची विश्वासपात्रता सहजरित्या तुम्ही लिंक्डइनवर सिद्ध करु शकता. रिअल इस्टेट मार्केटिंगच्या रणनीतींसाठी तुम्ही जे कष्ट घेताय त्याच्यासाठी तुम्हाला पटकन फळ कसे मिळेल? तुम्ही लिंक्डइन रणनीतींवर लक्ष केंद्रित करायला हवे. तुमच्या रिअल इस्टेट मार्केटिंग कंपनी प्रोफाईलसाठी कस्टमर युआरएल(custom URL) करायला विसरू नका. त्यासोबत वासलेवार म्हणून तुमचा अनुभव संक्षिप्त रूपात सांगा. तसेच रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन तुम्ही सांगु शकता. आणि तुमच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल सांगा. तुमचे सामर्थ्य काय आहे हे नमुद करायला विसरु नका. त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्केटिंगचे जाळे तयार करायला आणि पसरवायला सुरुवात करू शकता.कधीही इतरांसाठी उपयुक्त रियाल इस्टेट कंटेन्ट करा उदाहरण, इन्फोग्राफिकस, मार्केटिंगचे सल्ले, आजूबाजूच्या परिसरातील बातम्या इत्यादी.
शेवटचे विचार
तुमची रिअल इस्टेट मार्केटिंग कंपनी पुढे जात आहे का? तुम्ही योग्य रिअल इस्टेट मार्केटिंग रणनीतींचा वापर करत आहात का? रिअल इस्टेट मार्केटिंगच्या रणनीतींसाठी तुम्ही जे कष्ट घेताय त्याच्यासाठी तुम्हाला पटकन फळ हवं आहे का? त्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये गुंतवणुक करावी लागेल. तुमच्या विद्यमान ग्राहकांना सांभाळावे लागेल. नवीन ग्राहकांना तुमच्याशी जुळवुन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रभावी मार्गांचा वापर करा. म्हणजेच तुम्हाला सतत सोशल मीडिया मार्केटिंगसाठी उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करावा लागेल. त्यासोबत नवनवीन सोशल मीडिया मार्केटिंग युक्तींचा वापर करत राहा.
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon