Tuesday, January 14, 2020

कंटेन्ट रायटिंग म्हणजे नक्की काय ?

अनेकदा आपण जेव्हा ओएलएक्स ,क्विकर ,इंडिड.कॉम ,जॉबरॅपीडो.कॉम आणि इतर  माध्यमातून  बेळगांवमध्ये नोकरी शोधत असतो त्यावेळी आपल्याला अशा काही खालील गोष्टी बघायला मिळतात

अनेक लोकांना असे वाटते की एका वेबसाईटवरून माहितीची नक्कल करून दुसऱ्या वेबसाईटवर ती माहिती नमूद करणे हे कंटेन्ट लिहिणाऱ्याचे काम आहे. सुरुवातीला जेव्हा मी ब्रेन्स मिडिया सोल्युशन्स येथे काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी मलाही असेच वाटले होते .

पण हे चुकीचे आहे


एका विषयावर स्वतःच्या शब्दात  माहिती लिहिणे हे कंटेन्ट रायटरचे काम आहे . कंटेन्ट रायटरने  दिलेल्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयावर माहिती मिळवून ,महत्वाचे मुद्दे लिहून ती माहिती  स्वतः च्या शब्दात मांडावी लागते .जी माहिती अनेक ऑनलाई वेबसाईटवर आढळते त्याला कंटेन्ट रायटिंग असे म्हणतात . ही माहिती अस्सल ,वाचनासाठी  आणि  सोपी  असावी लागते .उदाहरण :- आपण जेव्हा गूगलमध्ये बेळगांव ,कर्नाटक लिहितो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणाची माहिती मिळते

गुगल कडून जी माहिती पुरविली आहे त्याला कंटेन्ट असे म्हणतात . वरील छायाचित्रात  जी  अधोरेखित केलेली माहिती आहे तो बेळगांव बद्दल कंटेन्ट  लिहिलेला  आहे


आणखीन एक उदाहरण:-
जेव्हा आपण गुगल मध्ये शोधत असतो " एग करी कशी बनवायची " त्यावेळी आपल्याला प्रत्येक  पायरीनुसार अशी माहिती मिळते.
  प्रत्येक पायरीनुसार  बनवलेल्या  पदार्थालाच  कंटेन्ट  म्हणतात.  जर तुम्ही कंटेन्ट रायटरअसाल तर तुम्हाला ग्राहकाकडून विषय दिला जातो आणि त्या विषयावर तुम्हाला तुमच्या शब्दात माहिती लिहावी लागते

जी वाक्यं तुम्ही लिहिता  ती कोणत्याही साईटवरून नक्कल केलेली नसावी . तुम्ही  इतर वेबसाईटवरून वाचून, महत्वाचे मुद्दे टिपून स्वतःची वाक्ये तयार करावी लागतात. कंटेन्ट रायटिंग म्हणजे नक्की काय ते मी तु म्हाला सांगेन


आपण कंटेन्ट रायटिंगचे काम का निवडावे ?
वर्ष ब्रेन्स मिडिया सोल्युशन्समध्ये काम केल्यानंतर मी खात्रीने म्हणू शकते की  इतर नोकऱ्यांपेक्षा कन्टेंट रायटिंगच्या क्षेत्रात नोकरी करण्यामुळे माझे भविष्य उज्वल आहे. या क्षेत्रात जर तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुम्ही ८००० ते ९००० रुपये दर महिना  कमवू शकता . जसजसे तुमचे लिखाण सुधारत जाईल आणि तुम्ही  पुरेसा अनुभव  प्राप्त करता, जसं की ते वर्षाचा अनुभव. त्यानंतर तुम्ही १५००० दर महिना पर्यंत कमवू शकताआकर्षक आहे ना !!!!
जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन्ट लिहू शकता जसे की ट्रायव्हल ,मेडिकल ,आयटी,रिअल इस्टेट इतर .तर तुम्ही  दर महिना २५००० रुपये महिना कमवू शकता . १००% सत्य !!!
आपण काही लोकप्रिय कंपन्या बघुयात ज्यांना त्यांच्या वेबसाईटसाठी कंटेन्टची आवशक्यता आहे
अमेझॉन 
आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अमेझॉन हा मोठ्ठा ऑनलाईन बाजार आहे, जिथे दररोज हजारोंच्या संख्येने उत्पादनाची विक्री केली जाते . जेव्हा आपल्याला एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करायची असते त्यावेळी आपण ती वस्तू  वेगवेगळ्या ऑनलाईन साईट्सवर जसंकी आपण ती वस्तू अमेझॉनवर शोधतो. आपल्या गरजेनुसार आपण अमेझॉनवर ती वस्तू ऑनलाईन शोधण्यास सुरुवात करतो .आता आपण एखाद्या वास्तूचे उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ :- " घरासाठी पडदे" त्यावेळी तिथे वेगवेगळ्या रंगांचे आणि प्रतींचे पडते आपल्याला दिसतात . जर तुम्ही  निळ्या रंगावर क्लिक केलं तर तुम्हाला अश्या प्रकाराचं पेज दिसेल 



इथे उत्पादनाची अधोरेखित केलेल्या  माहितीला कंटेन्ट असे म्हणतात .सहसा अश्या प्रकारच्या कंटेन्टला " उत्पादनाचे वर्णन " ( “Product Description”) असे म्हणतात

उत्पादनाच्या  वर्णनात  ( “Product Description”) असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे :-


* पहिल्या छायाचित्रात दाखविल्या  प्रमाणे उत्पादनाची तपशील
* दुसऱ्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे उत्पादनाबद्दल काही ओळींत माहिती
जर तुम्ही तो  पूर्ण परिच्छेद वाचलात तर तुम्हाला आढळून येईल की तो साध्या वाक्यात नाही आहे .त्यांनी काही कल्पक शब्दांचा वापर केला आहे . जसं की, “Add a touch of sophistication” आणि  “are extremely fine in quality and can be maintained easily.” त्याला कंटेन्ट रायटिंग किंव्हा उत्पादन वर्णन असे म्हणतात. तर आपण म्हणू शकतो की ;
" उत्पादनाच्या  वर्णनात  आपण उत्पादनाच्या वैशिष्ठ्यांना अधोरेखित करावे जेणेकरून ग्राहकाला उत्तम वस्तू  निवडता येतील . "
मेक माय ट्रिप :-
जर तुम्ही सुट्टीत  तुमच्या मित्र -मैत्रिणींसोबत गोव्याला जाण्याचे नियोजन करत असाल आणि तुम्ही ऑनलाईन हॉटेल बुक करण्याच्या विचारात असाल  तर तुम्ही  मेक माय ट्रिप किंव्हा कोणत्याही ऑनलाईन वेबसाईट बद्दल शोधत असतां त्यावेळी ते काही गोव्यातील हॉटेल्स दाखवतात .ज्यावेळी  तुम्ही एखाध्या विशिष्ठ हॉटेलवर क्लिक करता,  उदाहरणार्थ:- डे ग्रँड रिव्हिएरा , कलंगुट (De Grand Riviera, Calangute).त्यावेळी तुम्हाला खलील पेज दिसेल 



वरील लिहिलेला कंटेन्ट आपल्याला हॉटेलबद्दल थोडक्यात कल्पना देतो की हॉटेल कुठे आहे , हॉटेलजवळ कोणती ठिकाणे आहेत, हॉटेलमधील रूम्समधून कोणत्या सोयी उपलब्ध आहे आणि इतर गोष्टी. इथे कंटेन्ट ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विशिष्ठ रूम्स निवडण्यात मदत करतो
"ग्राहकांना अधिक संबंधित माहिती पुरविणे  म्हणजे कंटेन्ट रायटिंग  होय ."
                                                                  
                                   दूसच्या शब्दात  :- 
"कंटेन्ट हे एक माध्यम आहे ज्यातून ग्राहकाला तुमच्या कंपनीच्या  उत्पादनाबद्दल अधिक माहिती पुरविली जाते."
किंव्हा 


"साध्या भाषेत, एखाध्या विषयावर महत्वाची माहीती ऑनलाईन  युसर्ससाठी लिहीली जाते त्यालाच कंटेन्ट म्हणतात ."
काही कंटेन्ट रायटिंग नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या गोष्टींचा समावेश खालील प्रमाणे :-
* वेबसाइट्स साठी लिहिणे म्हणजेच  वेब कन्टेन्ट  रायटिंग (Web content writing). 


*बिसनेसाठी ब्लॉग्स आणि आर्टिकल लिहिणे
आयटी क्षेत्रात नुकत्याच होत असणाऱ्या विकासाबद्दल  टेक्निकल रायटिंग करणे .


* ट्रायव्हल वेबसाइट बद्दल मत लिहिणे .
नक्की वाचा ......

कंटेन्ट रायटिंग बद्दल मजेदार गोष्ट अशी आहे की, तुम्ही घरी बसल्या बसल्या कंटेन्ट रायटिंग करू शकता . जी व्यक्ती घरी बसल्या बसल्या वेगवेगळ्या विषयांवर कंटेन्ट लिहिते त्या व्यक्तीला फ्रीलान्सर कंटेन्ट रायटर असे म्हणतात . फ्रीलान्सर कंटेन्ट रायटींगचे काम खालील लोकांसाठी  योग्य आहे :-


* ज्या स्त्रियांना मुले आहेत आणि त्यांना  ते नोकरीसाठी शक्य नाही
* ज्या गृहिणींना बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नाही त्यांच्यासाठी .

* ज्या विध्यार्थ्यांना मोकळ्या वेळेत काम करून  पॉकेट मनी मिळवायची असले त्यांच्यासाठी


* निवृत्त झालेल्या लोकांसाठी ज्यांना अजूनही काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी 
तुम्हाला कन्टेंट रायटिंग करून फ्रीलान्सर रायटर व्हायचं आहे का?


जर तुमचे उत्तर होय असेल तर कृपया आपला रेस्युमे आम्हाला पाठवा किंव्हा आम्हाला येऊन भेट द्या . आमच्याकडे   लोकांना यशस्वी कंटेन्ट रायटर होण्यासाठी उत्तमरित्या प्रशिक्षण (training people) दिले जाते.
                                                                                                          Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon