Thursday, December 19, 2019

छोटया शहरांत व्यवसाय उभा करण्याची ५ महत्वाची करणे.

तुमच्याकडे नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अद्वितीय कल्पना आहेत काय? 
 तर तुम्ही योग्य विचार करताय. आणि खरंच याची सुरुवात कल्पनांपासूनच होते. पण फक्त कल्पना करून
चालत नाही. तुम्हाला खालील तीन महत्वाचे घटक विचारात आणावे लागतात. सगळ्यात पहिला, व्यवहाराचे
वातावरण. दुसरा, साधनांचा प्रवेश. जसं की - प्रतिभावंत लोकांचा समावेश, अर्थव्यवस्था, गुंतवणूक, कर्मचारी.
आणि तिसरा, व्यवसाय करण्याचे मूल्य. काही काळात मोठया शहरांनी होईल तितक्या उध्योजकांना आकर्षित
केले आहे. कारण त्यांनी व्यवहारासाठी लागणाऱ्या  योग्य वातावरणाचे आणि साधनांचे आकलन केले आहे.
पण इंटरनेट वापराच्या वाढत्या प्रगतीमुळे(internet access), संपर्कातील तंत्रज्ञानामुळे(Communications
Technology), बाजारांचे होणारे डिजिटलायझेशन(Digitalization of Market) आणि  दळणवळणात
होणाऱ्या प्रगतीमुळे परिस्थितीत बदल होण्यास सुरुवात झाली आहे.छोट्या शहरांचाही आता  एकत्रित आणि
क्रांतिकारक बाजाराकडे काळ आहे. त्यामुळे छोटया शहरातील विविध  फायद्यांमुळे तिथे  व्यवसायाचे
उध्योजन सुरु करण्याचा भर लक्षात येण्यासारखा आहे. 

                               

छोटया शहरात नवीन व्यवसाय  का सुरु करावा याचे ५ महत्वाची करणे खालील प्रमाणे दिली आहेत.

१. नवीन व्यवसाय सुरु करताना व्यापारासाठी लागणारा कमी खर्च.

सुरुवातीच्या काळात नवीन व्यवसायांना होणारा फायदा दुर्मिळ आणि मर्यादित असे. व्यवसाय चालू
ठेवण्यासाठी मोठया प्रमाणात तुम्हाला पैसा ओतावा लागत असे.  यातून पुढे जाण्यासाठी एक ते दोन वर्ष
लागत असत आणि  ते ही व्यवहारावर अवलंबून राहत असे. आणि त्यांनंतर चांगला फायदा होत असे. अनेक
नवीन  उभा केलेले व्यवसाय  सुरुवातीला चांगले चालतात त्यानंतर दुसऱ्या पातळीवर ते अयशस्वी होतात
जिथे उभा केलेला व्यवसाय सांभाळण्यात ते अयशवी होतात. व्यवसायातील अपुऱ्या निधीमुळेली असे होते.
उत्पन्न निर्माण न करणाऱ्या मालमत्तेवर जास्त प्रमाणात  पैसे गुंतवणे हा मूर्खपणा आहे. उदाहरण,
कार्यालयीन जागा, वखारी,कारखाना इत्यादी. मोठया शहरात कार्यालयासाठी जागा विकत घेणे किंवा भाड्याने
घेणे अत्यंत महागडे असते. कार्यालयासाठी दार महिना दिलेल्या भांड्यामुळे बचत केलेल्या आर्थिक निधीत
मोठा खळगा पडतो. पण तेच छोटया शहरात मालमत्ता  खूप कमी दरात उपलब्ध असते. मोठया शहरातील एक
तृतीयांशातील अर्ध्या किंमतीत ती गोष्ट लहान शहरात मिळते.  छोटया शहरात नवीन व्यवसाय सुरु केला की
कार्यासाठी अत्यंत कमी किंमत लागते. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळते.
अश्याप्रकारे नवीन व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक अश्या  जोखीमा घेऊ शकता. जर
तुम्हाला तुमची आर्थिक बाजु खालावायची नसेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या भवितव्यासाठी छोटया
शहराची निवड जरूर करा.

२. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि जीवनावश्यक गरजेसाठी येणार कमी खर्च.

दर महिन्याला द्याव्या लागणाऱ्या वेतनामुळे नवीन व्यवसायावर येणाऱ्या खर्चामुळे  व्यवसायावर भार
निर्माण होतो.  कमीत कमी वेतन देऊन तो पैसे नवीन व्यवसायात गुंतवणे ही चांगली हुशारी आहे. जर मोठया
प्रमाणात दिल्या जाणाऱ्या वेतनाची भरपाई करून घ्यायची असेल तर प्रत्येत कर्मचाऱ्याचे काम अत्यंत मोठया
प्रमाणात वाढवले पाहिजे. अमानुषपणे जास्त वेळ काम करणे, असुरक्षित,धोकादायक, अस्वस्थ पणे काम
करण्याच्या अटी सामान्य आहेत. छोटया शहरात व्यवसाय स्थापन करून तुम्ही अश्या व्यावसायिक कार्य
करून घेण्यापासून स्वतःला वाचवू शकता. कारण जीवनावश्यक वस्तूंची किंमत छोटया शहरांतून खूप कमी
असते. म्हणजेच जर तुलना केली तर  कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा सरासरी दार कमी असतो. अशाप्रकारे कोणतेही
अविश्वसनीय असे  व्यावसायिक नीतिशास्त्र न वापरता कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे मूल्य कमी होते. कमी
खर्चातील जीवनामुळे दुरुस्ती, सांभाळ, कुरिअर आणि इतर सगळ्या सेवा कमी खर्चात होतात आणि त्यामुळे
व्यवसाय व्यवस्थित रित्या चालतो.

आयुष्यात विवेकशून्य तडजोडी करणे टाळा आणि कुटुंबाला पहिले प्राधान्य दया.
नवीन स्थापन केलेल्या व्यवसायांमध्ये अधिक काळासाठी बांधील असावे लागते ज्यामुळे तुम्हाला कुटुंब
आणि नात्यांवर अनेक तडजोडी कराव्या लागतात. जर तुम्ही मोठया शहरात राहताय तर ह्या गोष्टी होणे
अटळ आहे. तेच लहान शहर तुम्हाला एक  विशाल जीवजनशैली अगदी कमी खर्चात उपलबद्ध करून देते.
स्टेडियम,क्लब्स,पूल्स सारख्या क्रीडासंबंधित सुविधा मर्यादित किंमतीत  उपलब्ध होतात.कुटुंब, मनोरंजन,
सामाजिक आयुष्य हे छोटया शहरात कमी खर्चिक असते . लहान शहरातील योग्य समतोलीत,सकस आयष्य
तुम्हाला दररोज तुमच्या स्वप्नांमागे जाण्यासाठी  उत्साही ठेवते.

३. लहान शहरातील उच्च प्रतिभेचा दर 

 मोठया शहरातून अत्यंत जास्त प्रमाणात प्रतिभा आणि कौशल्य आढळून येते यात काही संशयच नाही. 
काहीतरी वेगळ्या किंवा नवीन गोष्टीची उभारणी छोटया शहरात केल्यास तुम्ही लोकांच्या दृष्टीस  लगेच
पडता.  आणि त्यामुळे तुम्ही लगेचच स्थानिक पुढारी आणि अधिकारांच्या मंडळात खेचले जाता. याचा
उपयोग व्यवसायाचे जाळे वाढवण्यासाठी आणि  नवीन व्यापारासाठी आवश्यक स्थानिक पुढाकार मिळतो.
मोठ्या शहरातून साधनसंपत्तीचा आणि भांडवलाचा अतिरेक असतो. मोठया शहरातील गर्दीत नवीन व्यवसाय
हरवू शकतो. अधिक साधनसंपत्ती, भांडवल आणि ताकत असणारी व्यक्ती सहजपणे तुमच्या व्यवसायातील
कल्पना, योजना बळकावू शकते. जर तुम्ही प्रामाणिक पाने लढत असाल तरीही ते तुम्हाला मात  देतात. तेच
जर तुम्ही लहान शहरात अग्रेसर असाल  आणि जरीही तुमच्या विविध नवीन व्यवसायांचे अनुकरण कोणीतरी
करत  असेल तरीही तुम्ही  स्पर्धात्मक वातावरणाला तोडून तुम्ही एक चांगला प्रारंभ करू शकता.

४. कमी स्पर्धा आणि व्यवसायाचे जाळे पसरवण्यासाठी मिळणाऱ्या संधी.

 छोटया शहरात एक नवीन व्यवसाय किंवा  नवीन व्यवसायाशी उभारणी करणे  हि एक मोठी बाब आहॆ.
कोणत्याही वेगळ्या किंवा नवीन गोष्टीची उभारणी केल्यामुळे तुम्ही लगेच लहान स्थानिक समाजात
लोकांच्या दृष्टीस येता.त्यामुळे लवकरच तुम्ही स्थानिक पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या मंडळांकडे खेचले जाता.
यामुळे व्यवसायाचे जाळे  व वाढवण्यास तसेच व्यवसायातील उपक्रम राबवताना  स्थानिक पाठिंबा
मिळवण्यास मदत होते.

मोठया शहरात जास्त प्रमाणात  साधनसंपत्ती आणि भांडवल असल्यामुळे त्या गर्दीत तुमचा  नवीन व्यवसाय
सहजपणे हरवून जातो. जास्त साधनसंपत्ती,भांडवल,ताकत असणाऱ्या व्यक्तीकडे अनेक सुविधा असतात
आणि त्याचाच वापर एखादी व्यक्ती तुमच्या व्यवसायातील कल्पना, योजना बळकावून घेण्यास करू शकते.
जरी तुम्ही प्रामाणिक पाने लढत असाल तरीही ते तुम्हाला मात देतात. तेच जर तुम्ही छोट्या शहरात अग्रेसर
व्यवसाय करत असाल तर तिथे स्पर्धेचे प्रमाण आपोआत कमी होते आणि जरी कोणीही तुमच्या नवीन
व्यवसायाच्या कल्पना काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल तरीही तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाचा उत्तम
रित्या प्रारंभ करू शकता.

५. येण्या-जाण्याचा वेळ वाचतो  आणि उत्पादनात वाढ होते.

शहरातला वेग आणि ऊर्जा  अद्वितीय आहे पण त्याच बरोबर तेथील रहदारी आणि गर्दी ही दमवणारी आणि
त्रासदायक असते. दररोजच्या या सत्यापासून तुमची सुटका होऊच शकत नाही. खूप तास प्रवास करणे, काम
करणे या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्याला निचरून टाकतात आणि त्याची उत्पादन क्षमता कमी होते.तेच छोटया
शहरात येण्या- जाण्यासाठी कमी वेळ लागतो. मोठया शहरात २ ते ३  तासाची तुलना केली तर छोटया शहरात
१५ ते ३० मिनिटे लागतात.त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्यांच्या
कौशल्यात ते प्राविण्य मिळवून नवीन गोष्टी तयार करण्यास मदत होते. यामुळे त्यांच्यात उत्साह येतो, 
त्यांना प्रत्येक  गोष्टीची परिपूर्ती झाल्याची जाण होते आणि ते तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहतात.
त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायाच्या विस्तार, वितरण, बैठक, नियोजन,विचार या सारख्या क्रियांसाठी पुरेसा
वेळ मिळतो. ही सगळी कार्ये तुमच्या नवीन व्यवसायाला यशाच्या उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी खूप
आवश्यक आहेत.छोटी शहरे  नवीन व्यवसाय उभारणीच्या उपक्रमासाठी निराशजनक आहेत असेही समजले
जाते. पण थोडं संशोधन,योजना केल्या आणि दूरदृष्टीने विचार केला तर तुम्ही नक्कीच मान्य कराल की 
छोटया शहर  हे व्यवसाय टिकवण्यासाठी आणि प्रचंड किंमतीत लाभ मिळवण्यासाठी योग्य आहे.  तुम्ही  नवीन व्यवसायाला टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला  श्वास घेण्यासाठी  गरज आहे इतकी जागा मिळवण्यासाठी  छोटं शहर हा एकच मार्ग आहे. नवीन

लोकांसाठी छोटया शहरात खूप संध्या उपलब्ध आहेत. छोटी शहरे पण तुडुंब भरून जाण्याआधी तुम्हाला
मिळालेल्या संधीची चिन्हे ओळखा. नवीन व्यवसाय उभारणीसाठी छोटं शहर हे आजच्या पिढीचा मार्ग आहे.

                                                                                                           Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon