Thursday, May 9, 2019

वेबसाईटसाठी उत्कृष्ट कंटेन्ट कसा लिहायचा?

लोकांना तुमच्या वेबसाईटवर खेचून आणण्यासाठी तुम्हाला असंख्य एसइओ फ्रेंडली कन्टेन्ट लिहावा लागेल. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की लोक कंटेन्ट पूर्ण वाचण्यापेक्षा फक्त निरखून पाहतात. काही लोक तर फक्त पाहिलं पेज स्क्रोल करून बघतात आणि बाकी सगळं दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुम्हाला नेमका कंटेन्ट तयार करावा लागेल जो लोकांना त्वरित प्रेरित करेल  आणि तुमच्या वेबसाईट वर व्यस्त ठेवेल. उत्कृष्ट कंटेन्ट कसा तयार करायचा? आम्हाला सगळ्यांना आमच्या प्रश्नांची उत्तरे पटकन शोधायची असतात. 

तुम्हाला संभाषणात्मक कंटेन्ट तयार करावा लागेल आणि लोकांच्या प्रश्नांच्या संबंधित त्यांना उत्तरे मिळतील असा कंटेन्ट तयार करावा लागेल. यामुळे लोकांशी जुळून राहण्यात मदत होते. वेबसाईटच्या व्यावसायिक कंटेन्ट बद्दल  अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 


उत्कृष्ट कंटेन्ट कसा तयार करायचा? 

वेबसाईटसाठी उत्कृष्ट कंटेन्ट तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाचकांप्रमाणे विचार करावा लागेल. यामुळे तुम्हाला मुख्य मुद्द्यावर लिहिण्यास मदत होते. तुमच्या वेबसाईट्ससाठी कंटेन्ट लिहिण्या आधी तुम्हाला काही गोष्टींचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला  विविध  प्रश्न विचारावे लागतील. कोणत्या प्रकारच्या वाचकांच्या प्रतिसादाची तुम्ही अपेक्षा करत आहात? तुमच्या कंटेन्टचा उद्देश काय आहे? तुम्ही तुमच्या श्रोत्यांचे ग्राहकांत रूपांतर करण्यासाठी लिहीत आहात काय? जर होय ? तर तुमच्या श्रोत्यांवर चिरस्थायी ठसा उमटेल असा कंटेन्ट तुम्हाला तयार करावा लागेल.

संभाषणात्मक राहा आणि  विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे  ध्या. 

 तुमच्या लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असा संभाषणात्मक कंटेन्ट  तुम्हाला तयार करावा लागेल. अनेक लोक त्यांच्या एखाध्या हेतूने वेबसाईटला भेट देतात. तुमच्या कंटेन्टमध्ये काही मुद्द्यांना अधोरेखित करून तुम्ही  त्यांच्या हेतूंचे समाधान करा. त्याव्यतिरिक्त युसर काही विशिष्ठ किवर्डस सर्च इंजिनमध्ये एंटर करतात. तुम्ही तुमच्या कंटेन्टमधून प्रभावी उत्तर उपलब्ध करून द्यायला हवे. यामुळे लोकांचे ग्राहकांत रूपांतर करण्याच्या दारात वाढ होते. 

सुलभ राहा आणि कि मेसेजेस तयार करा. 

कंटेन्ट तयार करताना संकल्पित श्रोत्यांच्या  दृष्टिकोनाचा विचार करा. म्हणजेच तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व आणि स्वर त्यांच्याशी जुळवावे लागतील. तसेच  किचकट वाक्ये, अपभाषा आणि मोठे परिच्छेद लिहिण्याचे टाळा. त्याऐवजी 'मी',  'तुम्ही', "आपण" अशा शब्दांचा वापर करू शकता. कि मेसेजेस बुलेट लिस्टमधे सादर करायला हवे. प्रत्येत कल्पना वेगवेगळ्या विभागात मांडा. महत्वाचा संदेश सोप्या भाषेत समाजावून सांगण्यासाठी टेबल्स हा उत्तम प्रकार आहे. 

" जे कष्ट न घेता सहजतेने लिहिलं जातं ते आनंदाने वाचलं जात नाही. - स्याम्यूल जॉन्सन"

छायाचित्रे आणि शक्तीशाली शीर्षक वापरा. 

तुमच्या कंटेन्टमधे लहान आणि स्पष्ट शीर्षकांचा वापर करा. यामुळे युजरला जी माहिती हवी आहे त्या माहितीपर्यंत पोचण्यास त्यांना मदत होते. तुम्ही काही किवर्डसचा समावेश तुमच्या हेडिंग मधे करु शकता. तुमच्या हेडिंग्स कदाचित वाचकांना प्रतिसाद देण्याचे काम करतील. त्यासोबत तुम्ही तुमच्या कि मेसेजेसच्या संबंधित छायाचित्रांचा सामावेश करून त्यांना तुम्ही अधोरेखित करू शकता. 

लिखाणातील प्रवाह आणि स्पष्टता राखून ठेवा. 

महत्वाच्या संदेशापासून सुरुवात करा. यामुळे कंटेन्टचा प्रवाह राखून ठेवण्यात मदत होते. त्यानंतर तुमच्या कंटेन्टची रचना सोप्या प्रकारे करा. अनावश्यक शब्दांचा आणि वाक्यांचा वापर टाळा.तसेच कंटेन्ट प्रसारिक करण्याआधी वाचनीयतेची संख्या तपास. 

वेबसाईटच्या कंटेन्टचे महत्व 

तुमच्या वेबसाईटची रँकिंग तुम्हाला वाढवायची आहे का? तर आकर्षक कंटेन्ट लिहिणे महत्वाचे आहे. जर तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना जो कंटेन्ट हवा आहे तो तुम्ही पुरवायला हवा. अश्याप्रकारे सर्च इंजिन लोकांना हवा असलेला कंटेन्ट शोधण्यास मदत करतो. त्यासाठी तुम्ही वारंवार तुमचा कंटेन्ट उपडेट करायला हवा. तुमच्या कंटेन्टच्या  सेवांची माहिती देण्यासाठी पुरेसे पेजेस आहेत का? तुम्ही तुमच्या वेबसाईटवर इंजिन कंटेन्ट घालू शकता. यामुळे तुमच्या वेबसाईटचे लँडिंग पेज वाढवण्यात मदत होते. 

* तुम्ही विविध स्वरूपात महत्वाच्या कंटेन्टचा समावेश करू शकता. उदाहरण, ब्लॉग पोस्ट, विडिओस, बातम्या, फोटो, इन्फोग्राफिकस इत्यादी. 

* संबंधीत कंटेन्ट पोस्ट केल्यामुळे विश्वास बनवण्यासाठी मदत होते. 

* आकर्षक कंटेन्ट तुमच्या वेबसाईटला  इतरांपेक्षा वेगळी ओळख बनवण्यास मदत करते. 

* तुमच्या कंटेन्टमधे घोषवाक्यांचा समावेश करा. 

* तुम्ही उच्च किंमतीच्या ग्राहकांना निशाणा बनवायला हवे. 

शेवटचे विचार

तुमची सध्याची वेबसाईट तुमच्या निशान्यातील लोकांना आकर्षित करते का? तुम्ही दररोज किवर्ड रिच कंटेन्ट उपडेट करताय का?  जर नाही, तर तुमच्या कंटेन्ट मार्केटिंग नियोजनांना पडेट करायची ही योग्य वेळ आहे. या युक्तींचा वापर करून  तुम्ही ट्रॅफिक खेचू शकता आणि लीड्स वाढवू शकता. संबंधित कंटेन्ट पोस्ट करणे ही गंमत आहे जर तुम्ही योग्य रीतीने केलात तर. जेव्हा तुम्हाला लीड्स मिळवायचे असतात तेव्हा कंटेन्टचे  महत्व जास्त असते. उत्तम कंटेन्ट लिहिल्यामुळे फक्त रँकिंगच वाढत नाही तर तुम्हाला विश्वासपात्र आणि सुलभ बनवते.    
   
                    Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon