Wednesday, October 2, 2019

फ्रीलांस कंटेन्ट राईटर कसे बनायचे.

तुम्ही बेळगांवात  कंटेन्ट राईटरची  नोकरी बघताय का? आणि घरी बसून काम करायची तुमची ईच्छा आहे का? कंटेन्ट राईटींग घरी बसून आरामात तुम्हाला चांगल्या प्रमाणात पगार मिळवण्यास मदत करते. वेबसाईटसाठी लिहिण्याचे प्रशिक्षण घ्या. आणि फ्रीलांस ब्लॉगर बना. घरी बसून काम करण्यात मिळणारी लवचिकता हा कंटेन्ट राईटींग  तुमचा व्यवसाय म्हणून निवडल्यावर मिळणारा   सगळ्यात मोठा  फायदा आहे


घरी बसून काम करण्याचा पर्याय कोण निवडु  शकतं

* ज्यांना घरी बसून पार्ट टाईम करायचे आहे त्या गृहिणी

* तुम्हाला अधिक उत्पन्न कमवायचे असेल तर

* तुम्ही अनेक कार्ये करण्याची योजना करत असाल तर

* जर ऑनलाईन कंटेन्ट राईटींग हा तुमचा छंद असेल तर

* जर तुम्ही नवशिके आहेत आणि कंटेन्ट राईटींगमध्ये व्यवसाय करायची ईच्छा असेल तर

आणून अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही कंटेन्ट राईटींग  करू शकता....... 

कंटेन्ट राईटर कसे बनायचे हे शिकण्यासाठी तुमच्याकडे कोणते कोणते कौशल्य हवे

कंटेन्ट राईटींग आश्चर्यकारक आनंद घेऊन येतो. कंटेन्ट राईटींगमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी तुम्हाला काही कौशल्यांचा विकास करावा लागेल. जर तुम्ही या व्यवसायात नवखे  असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. या सूचना तुम्हाला कंटेन्ट राईटींगचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि  यशस्वी कंटेन्ट राईटर बनण्यास  नक्की मदत करतील.

आत्मसात करण्याची क्षमता

एक फ्रिलांक ब्लॉग राईटर म्हणून तुम्हाला लिखाणातील वेगवेगळे प्रकार आणि शैली आत्मसात कराव्या लागतील. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर तुमचे विचार आणि शब्द एका उद्देशातून लिहिले गेले पाहिजे. जर समजा तुम्ही पृष्ठभागाच्या पेजसाठी लिहीत आहात तर तुम्ही  लहान आणि कडकडीत आर्टिकल लिहाजेणेकरून तुमच्या वाचकांना  खात्री पटेल आणि ते कृती करतीलत्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पृष्ठभागासाठी तपशीलवार कंटेन्ट लिहावा लागेल. तसेच सोशल मीडियासाठी लागणारा लिखाणाचा प्रकार बदलतो. अश्यावेळी तुम्ही आकर्षक कंटेन्ट पोस्ट करायला हवा. जर तुम्हाला हे कौशल्य लाभलं तर तुम्ही आरामात उत्कृष्ट कंटेन्ट राईटर बनु शकता

अयोग्य संशोधन 

विस्तीर्ण संशोधन ही ऑनलाईन कंटेन्ट राईटींगची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे ब्लॉग पोस्ट्स लिहायचे असेल तर तुम्हाला त्या विशिष्ट क्षेत्राबद्दल उत्तम ज्ञान असायला हवे. उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट वाचकांना आकर्षित करतो. आणि कदाचित त्यांना तुमच्यासोबत व्यवसाय करण्यास सहमत करतो. मात्र अचूक स्तोत्रवुन माहिती शोधताय याची खात्री करा. वेबसाईटचा कन्टेन्ट  लिहिताना किंवा ब्लॉग पोस्टसाठी लिहिताना तुमचे विचार लेखणीतून उमटवण्याआधी तुम्हाला पूर्णपणे संशोधन करावे लागेल

तुमचे कंटेन्ट राईटींगचे कार्य योग्य रितीने आयोजित करा

तुमच्या कार्यस्थानाचे आयोजन करण्याशिवाय तुम्हाला तुमच्या कंटेन्टच्या दिनदर्शिकेचे आयोजन करावे लागेल. फ्रीलांस कंटेन्ट राईटींग करताना कंटेन्ट राईटींगचे कार्य योग्य रितीने आयोजित करणे पूर्णपणे आवश्यक आहे. तुम्हाला दिनदर्शिकेची देखरेख करावी लागते आणि काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत लिहून ठेवावी  लागते. यामुळे तुमचे कंटेन्टच्या कार्याचे व्यवस्थापन करण्यात  आणि इतर काम हे कार्यक्षम रितीने पूर्ण करण्यास मदत होते.शिवाय तुमच्या कंटेन्टच्या दिनदर्शिकेचे नियोजन करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनचं सुद्धा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही फ्रीलांस कंटेन्ट राईटींग करायचे ठरवता तेव्हा तुमच्या कार्याला प्राधान्य देणे ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिला करावे लागेल.  

लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अंतिम मुदत पूर्ण करणे

प्रत्येक कंटेन्ट राईटींग कंपनी असे फ्रीलांस राइटर्स  पसंद करतात जे अंतिम मुदत पूर्ण करण्यात कार्यक्षम आहेत. म्हणजेच उत्तम गुणवत्तेचा कंटेन्ट पोस्ट करण्यासाठी  लक्ष केंद्रित करण्याची आणि वेळेचे व्यवस्थापन करण्याची गरज असते

संपादनाचे कौशल्य

पहिल्या प्रयत्नात कोणताही आर्टिकल परिपूर्ण होत नाहीकंटेन्ट राईटींग एजेंसीला  तुमच्याकडून उत्तम काम करून देताना तुम्हाला संपादनात प्राविण्य मिळवावे लागेल. लिहिण्यापेक्षा संपादन जास्त वेळ घेऊ शकतं. तुम्ही संपादनाचा काम टाळू शकत नाही. व्याकरण आणि वाचनीयतेवर लक्ष दया. शब्दांची आणि वाक्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता  घ्यातुमचा कंटेन्ट साधा, समजण्यासाठी सोपा आणि अद्वितीय असूद्यात. त्याशिवाय प्रामाणापेक्षा गुणवत्तेवर लक्ष दया. हा   मंत्र निश्चितपणे  तुमच्या व्यवसायात तुमचे कौशल्य सिद्ध  करेल

कंटेन्ट राईटींगमध्ये तुम्हाला कारकीर्द घडवायची आहे? अद्यतनित रहा!

फ्रीलांस कंटेन्ट राईटर म्हणून तुमचे कौशल्य तुम्ही सिद्ध केले आहे का? पण ते पुरेसं नाही. नवीन ट्रेंड नुसार सतत तुमचे कौशल्य वाढवायला हवे. उदाहरणार्थ तुम्ही वेगवेगळे फ्रीलांस ग्रुप किंवा लिखाणाच्या  समुदायात सामील होऊ शकता. त्याबरोबर सोशल मीडियावर आकर्षक प्रोफाइल तयार करा. यामुळे तुम्ही नामवंत कंटेन्ट राईटींग कंपनीच्या दृष्टीस पडाल. म्हणून वेळ घ्या आणि ही कौशल्य वाढवा आणि बेळगांवमध्ये कंटेन्ट राईटींगची नोकरी मिळवा.        

                                                                                               Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon