तुम्ही तुमचा रिअल इस्टेटचा व्यवसाय वाढवण्याचे नियोजन करत आहात का? कंटेन्ट मार्केटिंग ही खरोखरंच तुमच्या ग्राहकांशी चांगले संबंध बनवण्याची गुरुकिल्ली आहे. रिअल इस्टेट मार्केटिंग कंपन्यांसाठी संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचणे खुप महत्वाचे असते. त्यासोबत तुमच्या क्षेत्रात तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे दिसाल हे सुद्धा शोधुन काढावे लागेल. जसंकी तुम्ही एखादी विशिष्ठ टॅगलाईन वापरताय का? तुम्ही स्वतःचे एका निश्चित प्रकारे वर्णन करू शकतां कां? तुम्हाला इतर रिअल इस्टेट व्यवसायांपेक्षा अग्रेसर राहण्यासाठी विविध मार्ग शोधावे लागतील.
तुमच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या वाढीसाठी कंटेन्ट मार्केटिंग महत्वाची का आहे?
कंटेन्ट मार्केटिंग रणनीतीचे महत्व एकदम स्पष्ठ आहे.
* तुमच्या ब्रँडचे मूल्य वाढवते.
* तुमच्या कंपनीची प्रतिष्ठा वर्धित केली जाते.
* लोकांना व्यस्त करणारा रिअल इस्टेट कंटेन्ट ग्राहकांच्या समस्यांना उपाय पुरवते.
* सोशल मीडिया मधील रियाल इस्टेट कंटेन्ट तुमच्या ब्रँड बद्दल जागरूकता निर्माण करते.
* तुमच्या वेबसाईटवरचे ट्रॅफिक वाढते.
*अधीक लिड्स निर्माण होतात.
रिअल इस्टेटसाठी कंटेन्ट मार्केटिंगच्या उत्तम पद्धती .
सगळ्यात पाहिला तुमची व्यावसायिक वेबसाईटची रचना तयार करून तुमचा स्वतःचा ठसा उमटवा. तुमच्या वेबसाईटची रचना संघटित आणि स्पष्ठ बनवायचा प्रयत्न करा. त्यासोबत नेविगेशन आणि सर्च टूलचा वापर करा.
* तुमच्या कंटेन्टसाठी दिनदर्शिका तयार करा. यामुळे तुम्हाला कंटेन्टचे वेळापत्रक बनवण्यास आणि अंतिम मुदतीच्या आधी काम पूर्ण करण्यात मदत होते. ब्लॉगिंग हा तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग आहे. यामुळे सर्च इंजिनमध्ये तुमची गणती वाढते. यामुळे तुमची विश्वासपात्रता सुद्धा वाढते.
* त्यासोबत तुम्ही ईमेलची यादी बनवू शकता. यामुळे तुम्हाला नविन कंटेन्ट आणि प्रॉपर्टीच्या अपडेट्स पाठवायला मदत होते. तुमची सबस्क्राइबर लिस्ट वाढवण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर ईमेल सबस्क्रिबशन बटनाचा समावेश करा. तुमची यादी तुमच्या खरेदीदारांच्या प्रकारानुसार तयार करून तुम्ही तुमच्या श्रोत्यांचे ग्राहकांत रूपांतर करू शकता.
* तुमचा सोशल मीडियावर सक्रिय सहभाग असायला हवा. सोशल मीडिया मधील रियाल इस्टेट कंटेन्ट हा खूपच महत्वाचा आहे. यामुळे तुम्हाला तरुण खरेदीदार, संभाव्य ग्राहक आणि इतर वासलेवारांशी जुळण्यास मदत होते. तुम्ही ग्रुप्स तयार करून तिथे तुमच्या लिस्टिंग शेअर करू शकता. छायाचित्र केंद्रित कंटेन्ट इंस्टाग्रामवर आणि पिंटरेस्टवर शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत फेसबुक ट्विटर,लिंक्डइन हे रिअल इस्टेट करारचा देखरेख करण्यासाठी फायदेशीर आहेत.
* शेवटचे पण महत्वाचे, तुम्हाला तुमच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी दररोज नवनवीन कंटेन्ट तयार करावा लागेल. वेगवेगळ्या स्वरूपात उच्च गुणवत्तेचा कंटेन्ट तयार करा. लिहीलेल्या आणि विजुअल कंटेन्टचे संयोजन करा. जसंकी, गाईड्स, फोटो, इन्फोग्राफिक्स,"हाऊ टु "(“how-to”)व्हिडीओज, जिफ्स,ब्लॉग पोस्ट आणि ईबुक.
"कंटेन्ट नातं बनवतं. नातं विश्वसावर बनतं.विश्वास महसूल घेऊन येतो. -अँड्र्यू डेव्हिस "
तुमचा रिअल इस्टेट व्यवसाय वाढवण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंगच्या कल्पना.
इतरांपेक्षा अग्रेसर राहण्यासाठी तुम्हाला नवीन रिअल इस्टेट मार्केटिंगच्या कल्पना घेऊन समोर यावे लागेल. कंटेन्ट मार्केटिंग हा त्यामधीलच एक भाग आहे. म्हणजेच रिअल इस्टेट मार्केटिंग रणनीतीमध्ये तुम्हाला कंटेन्ट मार्केटिंगचा सामावेश करावा लागेल.
विडिओ कंटेंट
युट्युबवर स्वतःचे रिअल इस्टेट चॅनेल तयार करून तुम्ही तुमच्या मालमतेची यादी करू शकता. तुमच्या मालमत्तेच्या आसपासच्या भागाचा आकर्षक विडिओ तयार करू शकता. जी घरे विक्रीसाठी आहेत त्यांचे वेबसाईटवर आणि सोशल मीडिया चॅनेलवर विडिओ पोस्ट करा. तुम्ही कसे काम करता याबद्दल तुमच्या कर्मचाऱ्यांची मुलखात घ्या. आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांना कश्याप्रकारे सेवा पुरवता, तसेच तुमच्या आनंदी ग्राहकांची मुलाखात घेऊन ती पोस्ट करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहकांची प्रशंसा मिळते.
विजुअल कंटेन्ट
तुमच्या मालमत्तेचे व्यावसायिक फोटो तुम्ही पोस्ट करायला हवे. तसेच रिअल इस्टेट व्यवसायातील आकडेवारी दर्शविणाऱ्या इन्फोग्राफिक्स चा समावेश करा. तुम्ही कल्पनांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकता आणि काही आकर्षक स्लाईडशोस तयार करून शेअर करू शकता. मार्केट विषयक माहिती आणि "हाऊ टु"(“how-to”) गाईड्सचा तुमच्या स्लाईडशोस मध्ये समावेश करू शकता. त्यासोबत काही फोटो, तुमच्या संघाचे बायोझ आणि तुमची मनोरंजक बाजू दाखवू शकता. या गोष्टी तुमच्या श्रोत्यांना तुमच्यावर अधिक विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहीत करतील.
लिहिलेला कंटेन्ट
तुम्ही लिहिलेल्या कंटेन्ट मध्ये तुमच्या ब्रँडच्या कथेचा समावेश असायला हवा. काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कंटेन्ट मधून द्या. जसंकी रिअल इस्टेट व्यवसायात तुम्हाला कसा रस आला? तुमचे कर्मचारी कोण आहेत? तुम्ही या क्षेत्रात कसा प्रवेश घेतलांत? तुमच्या व्यवसायातील काही सुरस बातम्या शेअर करा ज्यामुळे खरेदीदारांमध्ये रस निर्माण होतो. तुम्ही काही घर खरेदी आणि विक्रीच्या सूचनांचा समावेश सुद्धा करू शकता. तुमच्या ग्राहकांनी सतत विचारलेल्या प्रश्नांची ( frequently asked questions) उत्तरे वेगळ्या एफएक्यु पेज(FAQ page) मध्ये द्या. कश्याप्रकारे ब्लॉगिंग तुमच्या रिअल इस्टेट व्यवसायाची जाहिरात करते या बद्दल अधिक जाणून घ्या.
सारांश
तुमच्या निशान्यातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कंटेन्ट मार्केटिंगला विचारात घेत आहात कां? तुम्ही सर्जनशील रिअल इस्टेट मार्केटिंग कल्पनांचा विचार केला आहे का? तुम्ही काही इन्फ्लुएन्सर्स पर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता. रिअल इस्टेट कंटेन्ट तुमच्या क्षेत्रांत तुमचे कौशल्य सिद्ध करते. म्हणजेच तुम्हाला उत्तम गुणवत्तेच्या कंटेन्टवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासोबत तुम्हाला निकालाचे निरीक्षण करायला हवे. त्यासोबत तुमची सध्याची रिअल इस्टेट मार्केटिंग रणनीती योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही याची तपासणी करा.
Penned By: Ankita Kadam
Comment for Blog
EmoticonEmoticon